प्रियंका-निकच्या रिसेप्शनची आमंत्रण पत्रिका (Photo Credits: Instagram)

Priyanka Nick Mumbai Reception:  प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) 1-2 डिसेंबरला उदयपूरममधील उमेद भवन पॅलेसमध्ये विवाहबद्ध झाले. हा शाही विवाहसोहळा पार पडल्यानंतर दिल्लीत ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता 20 डिसेंबरला मुंबईत रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील ग्रँड रिसेप्शनचे इनवाईट आयफाने (iifa) इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. प्रियंका-निकचे रिसेप्शन मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये (Taj Lands End) करण्यात आले आहे. Priyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो!

तुम्हीही पाहा प्रियंका-निकची आमंत्रण पत्रिका (Invitation Card)...

प्रियंका-निकच्या मुंबईतील रिसेप्शनला अनेक बॉलिवूड स्टार्स हजेरी लावतील. दिल्लीतील रिसेप्शनला अनेक दिग्गजांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते.