Priyanka Chopra ने शेअर केला हनीमूनचा खास फोटो!
प्रियंका चोप्रा आणि निक जोनस (Photo Credits: Instagram)

नवविवाहित स्टार कपल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) ओमानमध्ये (Oman) हनीमून सेलिब्रेट करत आहेत. प्रियंका चोप्राने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला होता. समुद्र किनाऱ्यावरील या फोटोत तिने वाळूत तिने NJआणि PCJ असे लिहिले होते. हा फोटो ओमानमधील असल्याची चर्चा सध्या सोशल मीडिया रंगत आहे. त्याचबरोबर निक-प्रियंकाचा एक खास फोटो देखील समोर येत आहे. यात दोघांचा रोमांटीक अंदाज पाहायला मिळत आहे.

सध्या चर्चेत असलेले ईशा-आनंदच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये देखील निक-प्रियंकाने वर्णी लावली. त्यानंतर ते दोघे ओमानला गेले, असल्याचे बोलले जात आहे.

 

View this post on Instagram

 

Marital bliss they say..

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियंका लवकरच 'द स्काई इज पिंक' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतील. शोनाली बोस दिग्दर्शित या सिनेमात फरहान अख्तर आणि जायरा वासिम प्रमुख भूमिकेत आहेत.