सध्या लॉक डाऊन (Lockdown) मुळे अनेक गोष्टींवर बंधने आली आहे. त्यात चित्रपट सृष्टी बऱ्यापैकी प्रभावित झाली आहे. चित्रपटगृहे बंद असल्याने निर्माते, अभिनेते ओटीटी व्यासपीठाचा (OTT Platforms) आधार घेताना दिसून येत आहेत. आता 'देसी गर्ल' प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) अॅमेझॉन प्राइमशी (Amazon Prime) एक मोठा करार केला आहे. एका आंतरराष्ट्रीय मासिकाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, प्रियंका चोप्राने अॅमेझॉन प्राइमसोबत पूर्ण 2 वर्षासाठी मल्टी मिलियन डॉलरची ‘फर्स्ट लूक टेलिव्हिजन डील' (First-Look Television Deal) साईन केली आहे. स्वत: प्रियंका चोप्रानेही याची पुष्टी केली आहे.
प्रियंकाने या मासिकाचा अहवाल शेअर करत सांगितले आहे की, आता ती भाषेच्या मर्यादा तोडुन वेबसाठी एक उत्तम कंटेंट तयार करेल. आंतरराष्ट्रीय मासिका व्हरायटी (Variety) मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा फोटो शेअर करत प्रियंकाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे, 'अभिनेत्री आणि निर्माती म्हणून मी नेहमीच स्वप्न पाहते की, जगभरातील कुशल लोक सर्जनशील कंटेंट तयार करण्यासाठी एकत्र काम करतील आणि यासाठी कोणत्याही भाषेची सीमा असू नये. माझे प्रॉडक्शन हाऊस, 'पर्पल पेबल पिक्चर्स' चे नेहमीच हे ध्येय राहिले आहे व आता अॅमेझॉन बरोबरच्या माझ्या कराराचे ध्येय देखील हेच आहे.'
प्रियंकाने हे स्पष्ट केले आहे की, एक कलाकार आणि कथाकार म्हणून तिला नेहमीच नवीन कल्पनांवर काम करण्याची इच्छा असते जे केवळ मनोरंजनच नाही, तर लोकांच्या मनावर आणि विचारांवर प्रभाव पाडेल. प्रियंकाने पुढे लिहिले आहे, 'माझ्या 20 वर्षांच्या कारकीर्दीत, 60 पेक्षा जास्त चित्रपट केल्यावर आज मला वाटत आहे की मी माझ्या स्वपांच्या मार्गावर चालत आहे.' (हेही वाचा: अभिषेक बच्चन चा वेब शो Breathe- Into The Shadows चा दमदार ट्रेलर झाला प्रदर्शित,)
या बहु-मिलियन करारापूर्वीच प्रियंका चोप्रा तिचा नवरा निक जोनाससमवेत 'संगीत' नावाच्या रिअॅलिटी डान्स शोवर काम करत आहेत. हा कार्यक्रम भारतीय विवाहसोहळ्यातील संगीताच्या विधीवर आधारित असेल. याशिवाय प्रियंका अॅमेझॉनच्या एका गुप्तहेर ड्रामाचाही हिस्सा आहे. प्रियंकाचा हा नवा करार जागतिक असल्याने, त्याद्वारे इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये कंटेंट तयार होणार आहे.