अभिषेक बच्चन चा वेब शो Breathe- Into The Shadows चा दमदार ट्रेलर झाला प्रदर्शित, अंगावर काटा आणणारा हा Trailer नक्की पाहा
Breathe Into the Shadows Trailer (Photo Credits: YouTube)

अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)पहिल्यांदाच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. ब्रीथ इनटू द शैडो (Breathe Into The Shadows) च्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेब शो चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला. अंगावर काटा आणणारा हा ट्रेलर पाहून या वेब शो ची लोकांमध्ये प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. या ट्रेलर मध्ये अभिषेक बच्चन मनोवैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसत आहे. जो आपल्या मुलीच्या शोधात असून त्यासाठी खूप झटताना दिसत आहे. मात्र त्याच्या मुलीला पळवणारे त्याच्यासमोर एक विचित्र अट ठेवतात. ज्यामुळे शहरात वेगवेगळ्या घटना होतात. ज्याचा शोध पोलिस घेताना दिसत आहेत.

ब्रीथ इनटू द शॅडो या वेब सीरिजमध्ये अभिषेक बच्चन आणि नित्या मेनन प्रमुख भूमिकेत दिसतील. ब्रीथच्या पहिल्या भागामध्ये असलेले अमित साध देखील या शोमध्ये दिसतील. 3 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळणार आहे.

अक्षय कुमारच्या Laxmmi Bomb पासून ते आलिया भट्टचा Sadak 2, अजय देवगणचा Bhuj: The Pride of India असे 7 मोठे बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार Disney+ Hotstar वर; जाणून घ्या डीटेल्स

Breathe Into the Shadows ही वेबसीरीज 10 जुलैपासून अमेजॉन प्राईमवर स्ट्रीम केली जाईल. हा ट्रेलर पाहिल्यानंतर लोकांमध्ये याच्याबद्दल उत्सुकता वाढणे स्वाभाविक आहे.

अभिषेक बच्चन बॉलिवूडमध्ये आपली 20 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे यातही अभिषेक आपली जादू पसरवू शकण्यास यशस्वी ठरेल का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. इतकच नव्हे तर अभिषेक बच्चन बिग बुल सुद्धा OTT प्लेटफॉर्म प्रदर्शित होत आहे.