Coronavirus: देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या जीवघेण्या व्हायरसमुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 600 हून अधिक झाली आहे. तसेच राज्यात 130 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसचं संकट एवढं गडद असतानादेखील लोक त्याला गांभिर्याने घेत नाहीत. देशात लॉकडाऊन असताना लोक रस्त्यावर येत आहेत. तसेच अनेकजण सरकारच्या सुचनांचे उल्लंघन करून अवैध मार्गाने प्रवास करत आहेत.
बॉलिवुड अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) आपल्या ट्विटर हँडलवरून दुधाच्या टँकरच्या (Milk Van) आतमध्ये लपून प्रवास करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. रितेशने या मासिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (हेही वाचा - Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरस संकटावर मात करण्यासाठी ऋतिक रोशन, कपिल शर्मासह कलाकार मंडळी पुढे सरसावली)
What’s going on!!!!! People are being smuggled within India???? pic.twitter.com/MRPXB3TlJL
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 26, 2020
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ कोणत्या भागातील आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, लोक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. देशात लॉकडाऊन असतानादेखील लोक सरकारच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करत आहेत. तसेच दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे लॉकडाऊन काळात प्रचंड हाल होताना दिसत आहेत. हे लोक पायपीट करत हजारो किलोमीटरचा प्रवास करत आहेत.