Mirzapur 2 Trailer: अॅमेझॉन प्राइमवरील सुपरहिट वेब सीरिज 'मिर्झापूर सीझन 2' चा ट्रेलर प्रदर्शित; Watch Video
Mirzapur 2 Trailer Launch (Photo Credit - You Tube)

Mirzapur 2 Trailer: बाहुबली चित्रपटात कटप्पाने बाहुबलीला का मारले? याच उत्तर प्रेक्षकांना चित्रपटाच्या दुसऱ्या भागात मिळालं होतं. त्यामुळे आता अॅमेझॉनवरील 'मिर्झापूर 2' वेब सीरिजमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे प्रेक्षक 'मिर्झापूर 2' ची आतुरतेने वाट पाहत होते. आज लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित 'मिर्झापूर 2' च्या दुसऱ्या सीजनचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या दमदार ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे 5 लाख लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. सध्या सोशल मीडियावर मिर्झापूरचा ट्रेलर प्रचंड व्हायरल होत आहे.

अॅमेझॉन प्राईमने आज दुपारी 1 वाजता मिर्झापूर 2 वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज केला आहे. मिर्झापूर या वेब सीरिजच्या सीझन 2 मध्ये पंकज त्रिपाठी कालिन भैय्या ची भूमिका साकारताना दिसत आहे. तसेच अली फजल गुडडू च्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय दिव्येंदु शर्मा मुन्ना भैय्याच्या भूमिकेत आणि श्वेता त्रिपाठी गोलूच्या भूमिकेत दिसत आहे. (हेही वाचा - Kajal Aggarwal Getting Married to Gautam Kitchlu: दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल 30 ऑक्टोबरला गौतम किचलू सोबत अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर केली घोषणा)

मिर्झापूरचे दिग्दर्शन गुरमीतसिंग आणि मिहिर देसाई यांनी केले आहे. या वेब सीरिजची निर्मिती पुनीत कृष्णा, रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर निर्मित एक्सेल एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली करण्यात आली आहे. यापूर्वी मिर्झापूर 2 चा प्रोमो समोर आला होता. यात पंकज त्रिपाठी व दिव्येंदु शर्मा यांच्यामधील संवाद पाहायला मिळाला होता.

प्राप्त माहितीनुसार, 'मिर्झापूर 2' ही वेब सीरिज 23 ऑक्टोबर 2020 रोजी Amazon प्राइमवर रिलीज होणार आहे. मिर्झापूर हा उत्तर प्रदेशातील मिर्झापूरवर आधारित वेब शो आहे. या वेब सीरिजचा प्रत्येक भाग थरारक आहे. मिर्झापूर 2 चे शूटिंग खूप पूर्वी पूर्ण झाले होते. मात्र, पोस्ट प्रॉडक्शनचं काम लॉकडाऊनमध्ये बंद होतं. याच दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अली फजलच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे ते डबिंगचं काम करण्यास असमर्थ होते.