'पंचायत 2' (Panchayat 2) फेम अभिनेत्री आंचल तिवारीचा (Aanchal Tiwari) भीषण रस्ते अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघातामध्ये आंचल तिवारी सोबतच भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील 4 नवोदित कलाकारांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. अपघाताची ही घटना रविवारी बिहारच्या कैमूर जिल्ह्यामध्ये घडली. एसयूव्ही कार आणि मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. (हेही वाचा - Stampede at Bade Miyan Chote Miyan Lucknow Promotions: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफला भेटण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्साह; 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या प्रमोशनवेळी झाली चेंगराचेंगरी (Watch Video))
या अपघातामध्ये 'पंचायत 2' फेम अभिनेत्री आंचल तिवारी, भोजपुरी गायक छोटू पांडे, अभिनेत्री सिमरन श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये भोजपुरी चित्रपटसृष्टीतील चार नवोदित कलाकारांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे या कलाकारांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली असून सोशल मीडियावर पोस्ट करत अनेक जण दु:ख व्यक्त करत आहेत. बिहारमधील कैमूरमधील देवकाली गावात जीटी रोडवारजवळ रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला.
दोन महिलांसह 8 जण एसयूव्ही कारमधून प्रवास करत होते. या कारने आधी एका मोटरसायकलला धडक दिली. त्यानंतर कार आणि मोटरसायकल दुसऱ्या मार्गिकेवर गेल्या. त्याचवेळी भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. या घटनेमध्ये मोटरसायकल चालकासह 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.