Nitin Gadkari Attends Special Screening of Emergency (फोटो सौजन्य - X)

Nitin Gadkari Attends Special Screening of Emergency: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शनिवारी नागपुरात कंगना राणौत (Kangana Ranaut) च्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला (Special Screening of Emergency) हजेरी लावली. 'इमर्जन्सी'च्या स्क्रीनिंगला अनुपम खेर (Anupam Kher) देखील उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर नितीन गडकरी यांनी एक्सवर पोस्ट करत आपले विचार मांडताना भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या पण भयानक अध्यायावर प्रकाश टाकल्याबद्दल चित्रपट निर्माते आणि कलाकारांचे आभार मानले. यावेळी कंगना राणौतदेखील उपस्थित होती. यावेळी अभिनेत्रीने बेज रंगाच्या साडी परिधान केली होती. तर अनुपम खेर गडद निळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसले. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर, तिघांनी माध्यमांशी संवाद साधला आणि चित्रपटाबद्दल त्यांचे विचार मांडले.

कंगना राणौतने मानले आभार -

कंगनाने इंस्टाग्रामवर नितीन गडकरी यांचे आभार मानले. स्क्रिनिंगचे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, '#इमर्जन्सी विथ @gadbari.nitin जी.' हा चित्रपट 17 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. 'इमर्जन्सी' चित्रपटात श्रेयस तळपदे, अशोक छाब्रा, महिमा चौधरी, विशाख नायर, सतीश कौशिक, मिलिंद सोमण, लॅरी न्यू यॉर्कर आणि रिचर्ड क्लेन यांच्या भूमिका आहेत. तर झी स्टुडिओज, मणिकर्णिका फिल्म्स आणि रेणू पिट्टी यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (हेही वाचा -Emergency Movie Get Censor Certificate: कंगना रणौतला दिलासा, इमर्जन्सी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं U/A सर्टिफिकेट दिलं)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट -

तथापी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील X वर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'आज नागपुरात @KanganaTeam जी आणि श्री @AnupamPKher जी यांच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगला उपस्थित राहिलो. आपल्या देशाच्या इतिहासातील हा काळा अध्याय इतक्या प्रामाणिकपणे आणि उत्कृष्टतेने सादर केल्याबद्दल मी चित्रपट निर्माते आणि कलाकारांचे मनापासून आभार मानतो. भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडाचे चित्रण करणारा हा चित्रपट मी सर्वांना पाहण्याचा आग्रह करतो.  ( हेही वाचा -  Emergency चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; कंगनाला धक्का)

17 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार इमर्जन्सी चित्रपट -

कंगना राणौतने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच, कंगना स्वतः या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी कंगनाला खूप वाट पहावी लागली. हा चित्रपट बराच काळ सेन्सॉर बोर्डात अडकला होता. आता हा चित्रपट प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होत आहे.