#BollywoodStrikesBack: बॉलीवूडबाबत बेजबाबदार रिपोर्टिंग करणे वृत्त वाहिन्यांना पडले महागात; अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, करण जोहर आणि इतर 30 प्रॉडक्शन हाऊसेसनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली याचिका
Bollywood Strikes Back (Photo Credits: File Image)

देशातील काही मीडिया हाऊसेसद्वारे होणारे बेजबाबदार आणि अपमानकारक रिपोर्टिंगविरूद्ध आता बॉलिवूड (Bollywood) एक झाला आहे. असे मीडिया हाऊसेस आणि त्यांच्या पत्रकारांच्या विरोधात 4 चित्रपट संघटना आणि 34 चित्रपट निर्मात्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चॅनल रिपब्लिक टीव्ही (Republic TV), पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami), प्रदीप भंडारी (Pradeep Bhandari), चॅनल टाइम्स नाऊ, पत्रकार राहुल शिवशंकर (Rahul Shivshankar) आणि नविका कुमार (Navika Kumar) यांना बॉलिवूड सेलिब्रिटींविरूद्ध बेजबाबदार आणि अपमानकारक रिपोर्टिंग थांबवण्याच्या सूचना द्याव्या अशी विनंती याचिकेत केली आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या चौकशी प्रकरणात बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांनी, ‘काही मीडिया हाऊसेसनी बेजबाबदार रिपोर्टिंग’ केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. करण जोहर, यश राज, आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खानच्या प्रोडक्शन कंपन्या, चार चित्रपट उद्योग संघटना आणि 34 निर्माते यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की वाहिन्यांनी तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, 'बॉलिवूड आणि त्याच्या सदस्यांविरूद्ध बेजबाबदार, अपमानास्पद आणि अवमानकारक टिप्पणी करण्यास किंवा प्रकाशित करण्यास टाळावे.' (हेही वाचा: लोकल ट्रेन सुरु करण्यावरुन अभिनेत्री सौम्या टंडन हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करत गरीब आणि सामान्यांचे हाल का? म्हणत उपस्थितीत केला मुद्दा)

याचिकाकर्त्यांमध्ये या चार संघटना आहेत -

The Producers Guild of India

The Cine & TV Artiste Association

The Film and TV Producers Council

Screenwriters Association

हे 34 प्रोडक्शन हाऊस समाविष्ट आहेत -

Aamir Khan Productions

Ad-Labs Films

Ajay Devgn Films

Andolan Films

Anil Kapoor Film and Communication Network

Arbaaz Khan Productions

Ashutosh Gowariker Productions

BSK Network and Entertainment

Cape of Good Films

Clean Slate Filmz

Dharma Productions

Emmay Entertainment & Motion Pictures

Excel Entertainment

Filmkraft Productions

Hope Production

Kabir Khan Films

Luv Films Macguffin Pictures

Nadiadwala Grandson Entertainment

One India Stories

R.S. Entertainment

Rakeysh Omprakash

Mehra Pictures

Red Chillies Entertainment

Reliance Big Entertainment

Reel Life Productions

Rohit Shetty Pictures

Roy Kapur Productions

Salman Khan Ventures

Sohail Khan Productions

Sikhya Entertainment

Tiger Baby Digital

Vinod Chopra Films

Vishal Bhardwaj Film

Yash Raj Films

दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर फिल्म इंडस्ट्री व इथल्या लोकांवर वैयक्तिक हल्ले होत आहेत. बॉलिवूडसाठी घाणेरडे, चरसी लोकांचा किल्ला, समाजाची घाण यांसारखे घृणास्पद शब्द वापरण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर, 'बॉलिवूड असे ठिकाण आहे जिथली घाण साफ करणे आवश्यक आहे,' यासारख्या अपमानकारक उपमा चॅनेलद्वारे वापरल्या जात आहेत. याच बाबत आता बॉलीवूडमधील काही मंडळी एकत्र आली आहेत.