Nawazuddin Siddiqui (PC - Facebook)

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. नवाजुद्दीनने केवळ उत्तम चित्रपटच नाही तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'सेक्रेड गेम्स'सारखे सुपरहिट शो ही दिले आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर नवाजच्या शोला चांगलीच पसंती मिळाली असली तरी, आता तो कोणत्याही ओटीटी (OTT) शोमध्ये दिसणार नाही. नवाजने ओटीटी व्यासपीठ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तो म्हणतो की, आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कंटेंट पाहून तो खूप निराश झाला आहे.

बॉलीवूड हंगामाशी बोलताना नवाज म्हणाला की, ‘डिजिटल प्लॅटफॉर्म आता अनावश्यक आणि निकृष्ट दर्जाच्या कंटेंटसाठी डंपिंग ग्राउंड म्हणून काम करत आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी कोणतेही चांगले शो नाहीत किंवा जुन्या शोचे सिक्वेल येथे दाखवले जात आहेत ज्यात दाखवण्यासारखे काहीच नाही.’ याबद्दल पुढे बोलताना नवाज म्हणाला, 'जेव्हा मी नेटफ्लिक्ससाठी सेक्रेड गेम्स केले, तेव्हा मी खूप उत्साहित होतो आणि डिजिटल माध्यमाला आव्हान म्हणून घेत होतो. इथे नवीन कलागुणांना वाव मिळत होता, पण आता हा ताजेपणा नाहीसा झाला आहे.’

तो पुढे म्हणाला, ‘आता मोठ्या प्रोडक्शन हाऊस आणि ओटीटीच्या तथाकथित सुपरस्टार्ससाठी हा व्यवसाय बनला आहे. मोठ्या निर्मात्यांना अधिकाधिक कंटेंट बनवण्यासाठी भरपूर पैसे मिळत आहेत, ज्यामुळे गुणवत्ता संपली आहे. आता ओटीटी शोचा सामना करणे कठीण झाले आहे.’ अशा परिस्थितीत तो अशा निरुपयोगी कंटेंटचा भाग बनू इच्छित नाही. (हेही वाचा: Bheed: 'अनुभव सिन्हाच्या' 'भिड'मध्ये राजकुमार रावसोबत दिसणार 'भूमी पेडणेकर')

नवाज म्हणतो की ओटीटीवरील कंटेंट आता त्याला असह्य झाला आहे, त्यामुळे तो अशा लोकांसोबत काम करू शकत नाही जे अशा कंटेंटची निर्मिती करत आहेत. तो म्हणतो की, कथित ओटीटी स्टार्स स्वतःला ए-लिस्टर म्हणवून घेतात आणि खूप पैसे मागतात. दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकीने 'सेक्रेड गेम्स'मधून ओटीटीवर पदार्पण केले. या वेब सिरीजमधील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले आणि तो डिजिटलवरही लोकप्रिय झाला. नवाजने ओटीटीसाठी रात अकेली है, धूमकेतू, सिरीयस मॅन सारखे चित्रपटही केले आहेत.