सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी दिग्दर्शक संजय लिला भंसाली पोहचले वांद्रे पोलीस स्थानकात
Producer Sanjay Leela Bhansali (Photo Credits-ANI)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भंसाली (Sanjay Leela Bhansali) त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी वांद्रे पोलीस स्थानकात पोहचले आहेत. भंसाली पोलीस स्थानकात संपूर्ण टीमसोबत आले आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे ही सांगण्यात आले होते की, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणे संजय लीला भंसाली यांची चौकशी केली जाऊ शकते. सुशांत आणि संजय लीला भंसाली यांनी एकाही चित्रपटासाठी एकत्रितपणे कधीच काम केलेले नाही. तरीही भंसाली यांची सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. खरंतर भंसाली यांनी दोन चित्रपटांमधून सुशांतला देण्यात आलेली मुख्य कलाकाराची भुमिका दिल्यानंतर काढून टाकले होते.(बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने 'या' कारणासाठी सोडला होता RAW चित्रपट)

वांद्रे पोलीस स्थानकात पोहचण्यापूर्वी भंसाली त्यांच्या जुहू स्थित कार्यालयात गेले होते. त्यांनी कार्यालयात त्यांच्या टीमसोबत या प्रकरणी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. भंसाली यांनी गाडीत बसूनच त्यांच्या टीमसोबत चर्चा केली. कार्यालयातून पोलीस स्थानकात जाण्यापर्यंत संजय लीला भंसाली यांना वारंवार सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी का ओढले गेल्याचे विचारण्यात आले. परंतु भंसाली यांनी यावर कोणतेच उत्तर दिले नाही.(सुशांत सिंह राजपूत याची 'दिल बेचारा' सिनेमातील को-स्टार संजना संघी हिने सोडली मुंबई; पहा पोस्ट) 

दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांचा चित्रपट राम लीला मध्ये मुख्य कलाकाराच्या भुमिकेत दीपिका आणि रणवीर सिंग दिसून आले होते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, भंसाली यांनी राम लीला हा चित्रपट सुशांत याला डोक्यात ठेवत त्याची स्क्रिप्टिंग केली होती. या चित्रपटात सुशांत याला कास्ट करण्यात आले होते. परंतु त्यावेळी सुशांत यश राज फिल्मच्या 3 बड्या चित्रपटांमध्ये व्यस्त होता.