बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने 'या' कारणासाठी सोडला होता RAW चित्रपट
RAW movie Poster (PC - Twitter)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. सुशांतने नेपोटिझमला कंटाळून आत्महत्या केली, असं म्हटलं जात आहे. नेपोटिझममुळे सुशांतला अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आलं होतं. सुशांतच्या मृत्यूनंतर त्यांच्या संदर्भातील अनेक रहस्य उलगडण्यास सुरुवात झाली आहे. सुशांतला पीरियड थ्रीलर फिल्म रोमियो अकबर वॉल्टर (RAW) मध्ये स्पायच्या मुख्य भूमिकेसाठी साइन करण्यात आलं होतं. परंतु, नंतर ही भूमिका जॉन अब्राहमने साकारली होती.

विशेष म्हणजे सुशांतने हा चित्रपट साइन केल्यानंतर या चित्रपटाचं पोस्टरदेखील सुशांतला फ्रंट आणि सेंटरला ठेऊन डिझाइन करण्यात आलं होतं. मात्र, शेड्युल कॉनफ्लिक्टमुळे सुशांतला हा चित्रपट सोडावा लागला होता. सुशांतने हा चित्रपट सोडल्यानंतर निर्माता बंटी वालिया आणि निर्देशन रोबी ग्रेवाल यांना मोठा धक्का बसला होता. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण चे इन्स्टाग्रामवर झाले 50 मिलियन फॉलोअर्स; सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमारलाही टाकले मागे)

दरम्यान, सुशांतने एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात माहिती दिली होती. सुशांतने त्याच्या पहिल्या सिनेमाच्या कमिटमेंटमुळे रोमियो अकबर वॉल्टर हा चित्रपट सोडला होता. त्यावेळी सुशांतने सांगितलं होतं की, मला हा चित्रपट करायचा होता. या चित्रपटाची कथा मला खूप आवडली होती. परंतु, मी हा चित्रपट करू शकत नाही, असंही सुशांतने म्हटलं होतं.