बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण चे इन्स्टाग्रामवर झाले 50 मिलियन फॉलोअर्स; सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमारलाही टाकले मागे
दीपिका पादुकोण (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. दीपिका पादुकोणच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 50 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. दीपिका ने सोशल मीडिया अकाउंटवर सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) ला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे दीपिका इन्स्टाग्रामवर 50 मिलियन फॉलोअर्स क्रॉस करणारी भारतातील दुसरी महिला बनली आहे.

विराट कोहली (Virat Kohli) आणि प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) नंतर दीपिकाने हे यश मिळवलं आहे. दीपिका पादुकोणने आतापर्यंत 1.139 पोस्ट शेअर केल्या आहेत. दीपिका इन्स्टाग्रामवर 126 लोकांना फॉलो करते. यात तिच्या कुटुंबातील तसेच बॉलीवुडमधील कलाकारांचा समावेश आहे. (हेही वाचा - Dil Bechara Trailer Release Date: सुशांत सिंह राजपूत याचा चित्रपट 'दिल बेचारा'चा ट्रेलर उद्या होणार प्रदर्शित)

Deepika Padukone has 50 million followers on Instagram

 

View this post on Instagram

 

#happysunday

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दरम्यान, 2019 मध्ये इंस्टाग्राम अकाउंटची रिच लिस्ट बनवण्यात आली होती. ज्यामध्ये प्रियंका चोप्रा, विराट कोहली यांच्यासह दीपिका पादुकोणच्या नावाचादेखील समावेश होता. त्यामुळे इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिराती करण्यासाठी दीपिका 1.5 कोटी रुपये चार्ज घेते. दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरचं कबीर खान दिग्दर्शित चित्रपट '83' मध्ये रणवीर सिंहसोबत दिसणार आहे.