मुंबई: आर.के. स्टुडिओचे मालकी हक्क आता गोदरेज प्रॉपर्टीजला दिले, कपूर कुटुंबियांचा निर्णय
R.K. Studios (Photo Credits-Twitter)

मुंबई (Mumbai) येथील चेंबूर (Chembur) मधील स्थित आर. के. स्टुडिओचे (R.K. Studios) मालकी हक्क आता गोदरेज प्रॉपर्टीजला (Godrej Properties)  देण्यात आले आहे. या ठिकाणी आलिशान फ्लॅट्स उभारले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

2.2 एकर क्षेत्रात आर. के. स्टुडिओजची उभारणी करण्यात आली होती. मात्र स्टुडिओजच्या विक्रीची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून कपूर कुटुंबीय हे गोदरेज प्रॉपर्टीसोबत या जागेबद्दल चर्चा करत होते. तर 33,00 वर्ग मीटर क्षेत्रात या आलिशान फ्लॅट्सची उभारणी करण्यात येणार आहे.(बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर कॅन्सरमुक्त, दिग्दर्शक राहुल रावेल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला खुलासा)

तर चेंबूर येथील जागा फार महत्वपूर्ण असल्याने ती नवीन बांधकामासाठी गोदरेज प्रॉपर्टीला देत असल्याचे रणधीर कपूर यांनी सांगितले आहे. त्याचसोबत स्टुडिओमधून मिळणारे उत्पन्न कमी आणि खर्चच जास्त होत असल्याने कपूर कुटुंबियांनी आर.के. स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे.