बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या मुंबईमध्ये वांद्रे परिसरातील कार्यलायामध्ये काल बीएमसीने ( Brihanmumbai Municipal Corporation) तोडक कारवाई केल्यानंतर वातावरण तापलेलं असताना आता बीएमसीने बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिजाइनर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra ) यालादेखील अवैध बांधकामाबद्दल (Unauthorised Alterations) नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ही नोटीस 7 सप्टेंबरला दिली असून त्यापुढे सात दिवसांची मुदत नोटिशीला उत्तर देण्यासाठी देण्यात आली आहे.
मनीष मल्होत्रा हा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी ड्रेस डिझाईनिंग करतो. त्यासोबतच अनेक इव्हेंट्सामध्ये त्याचा सहभाग पहायला मिळाला आहे. मनीष मल्होत्राच कार्यालय मुंबईमध्ये खार रोड पश्चिम परिसरामध्ये आहे.
ANI Tweet
Mumbai's Brihanmumbai Municipal Corporation (BMC) issued a show-cause notice to fashion designer Manish Malhotra on September 7, for allegedly making "unauthorised alterations" at his office building. BMC has sought a reply from him within seven days
— ANI (@ANI) September 10, 2020
बीएमसीच्या आरोपानुसार, मनीषने परवानगी शिवाय रहिवासी बंगल्याचं कमर्शिअल प्रॉपर्टीमध्ये रूपांतरण केले आहे. त्यासोबतच काही अवैध बांधकाम आहे. त्याला सेक्शन 351 अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान मनीष मल्होत्रा हा अभिनेत्री कंगनाचा शेजारी आहे. काल बीएमसीने कंगनाच्या कार्यालयापाठोपाठ बंगल्यावरही नोटीस लावली होती. आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये कंगनाच्या कार्यालयावर बीएमसीने केलेल्या कारवाई बद्दल दुपारी 3 च्या सुमारास सुनावणी होणार आहे.
काल बीएमसीने कंगनाच्या पाली हिल येथील मणिकर्णिका कार्यालय तोडले आहे. त्यावर कंगनाने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान कोणतेही अवैध बांधकाम नव्हते असा दावा तिने केला आहे. तिचे वकील रिझवान सिद्धिकी यांनी बीएमसी कर्मचार्यांना प्रकरण न्यायलयात असल्याने कारवाई थांबवण्यास सांंगितले होते.