Mouni Roy Birthday Pictures: बर्थडे गर्ल मौनी रॉय मालदीव मध्ये करतेय Chill, पहा हे हॉट सुंदर फोटो
Mouni Roy (Photo Credits: Instagram)

Mouni Roy Birthday Special: भल्याभल्यांंना वेड लावेल अशी नागिन, (नाही नाही खरीखुरी नव्हे) या मालिकेत मुख्य भुमिकेत दिसणारी मौनी रॉय (Mouni Roy) आज आपला वाढदिवस मालदीव (Maldives) मध्ये साजरा करत आहे. काल रात्रीपासुनच तिचे फॅन्स सोशल मीडियावरुन शुभेच्छांंचा वर्षाव करत होते या सगळ्यांंचे आभार मानत आज मौनी ने आपल्या इंस्टाग्राम वरुन काही खास फोटो आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. निळ्याशार समुद्राच्या किनारी असलेल्या लाकडी सुंंदर घरात मौनी आपला बर्थडे साजरा करतेय.मागील अनेक दिवसांंपासुन ती इथेच राहतेय, आणि म्हणावं तर लॉकडाउन चांंगलंच एंजॉय करतेय, तुम्ही तिच्या फोटो मध्ये याचा अंदाज घेऊ शकता. अगदी Beach Baby बनुन बिकिनी मध्ये ती कधी टॅनिंग करुन घेताना दिसतेय तर कधी कधी चिल्ल करतानाचे हे क्षण आपल्या फॅन्स सोबत शेअर करत असते. Mouni Roy Hot Photos: बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय दुबईत करतीय एन्जॉय; पहा फोटोज

मौनी रॉय हिचा जन्म 28 सप्टेंबर 1985 मध्ये झाला होता, तिने आपल्या करिअरची सुरुवातीच्या काळात तिने मॉडेलिंंग केले होते, नंंतर एकता कपूरची सर्वात लोकप्रिय मालिका 'क्योंकि सांस भी कभी बहू थी' या मालिकेमधून मौनी ने पदार्पण केले. Mouni Roy ने ऐश्वर्या राय बच्चन हिच्या ताल चित्रपटातील 'या' लोकप्रिय गाण्यावर केला डान्स; Watch Viral Video

मौनी रॉय Photos

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy) on

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy) on

मौनी ने काही बॉलिवूड चित्रपटात सुद्धा काम केले आहे. ती गोल्ड' या चित्रपटामधून खिलाडी अक्षय कुमार सोबत झळकली होती,तसेच नवाझुद्दिन सिद्दकी सोबत बोले चुडियांं मध्येही तिने काम केलेय, तिचा आगामी चित्रपट ब्रम्हास्त्र सुद्धा रिलीज साठी तयार आहे.