Mouni Roy Hot Photos: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्याने बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सध्या दुबई (Dubai) मध्ये आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत राहत आहे. मौनी रॉय दुबईत पोहचल्यानंतर भारतात लॉकडाऊन घोषीत करण्यात आलं होतं. तेव्हापासून मौनी रॉय दुबईमध्ये वास्तव्यास आहे.
मात्र, दुबईत राहूनदेखील मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नेहमी स्वत: चे हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सध्या तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक हॉट फोटोज शेअर केला आहे. या फोटोला तिच्या चाहत्यांनी लाईक तसेच कमेंन्ट्स केल्या आहेत. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने 'या' कारणासाठी सोडला होता RAW चित्रपट)
दरम्यान, मौनी दुबईमध्ये बिंदास्त होऊन आनंदी जीवन जगत आहे. मौनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ती अत्यंत हॉट ड्रेसमध्ये दिसत आहे. एकता कपूरची सर्वात लोकप्रिय मालिका 'क्योंकि सांस भी कभी बहू थी' या मालिकेमधून पदार्पण करणारी मौनी रॉय सध्या बॉलिवूडमध्येही प्रचंड लोकप्रिय होत आहे. 'गोल्ड' या चित्रपटामधून खिलाडी अक्षय कुमार सोबत झळकल्यानंतर मौनी हळूहळू बॉलिवूडमध्येही आपले घट्ट रोवू लागली आहे. तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोज आणि व्हिडिओज मुळे ती सोशल मिडियावरदेखील नेहमी चर्चेत असते.