Mouni Roy ने ऐश्वर्या राय बच्चन हिच्या ताल चित्रपटातील 'या' लोकप्रिय गाण्यावर केला डान्स; Watch Viral Video
Mouni Roy (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्री मौनी रॉय(Mouni Roy) लॉकडाऊनमध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहे. कधी आपले ग्लॅमरस फोटो शेअर करुन तर कधी व्हिडिओ शेअर करुन. यामुळे नेहमीच ती चर्चेत असते. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ऐश्वर्या राय बच्चनच्या (Aishwarya Rai Bachchan) एक लोकप्रिय गाण्यावर अप्रतिम नृत्य करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ऐश्वर्याच्या 'ताल' (Taal) चित्रपटातील ताल से ताल मिला या गाण्यावर एक सुंदर डान्स सादर केला आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

ताल या चित्रपटातील ऐश्वर्याने यावर सुंदर डान्स केला होता. तिच्याच स्टाईलमध्ये मौनी डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओला अडीच लाखाहून अधिक लोकांनी पसंत केले आहे. तसेच हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. Mouni Roy Hot Photos: बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय दुबईत करतीय एन्जॉय; पहा फोटोज

‘ताल’ हा ऐश्वर्या रायच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटातील ‘ताल से ताल मिला’ हे गाणं तुफान गाजलं होतं. ऑस्कर पुरस्कार विजेते ए. आर. रेहमान यांनी या गाण्याची निर्मिती केली होती. या गाण्याला त्यावेळी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. याच सुपरहिट गाण्यावर मैनीला डान्स करताना पाहून तिचे चाहते आनंदी झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वी मौनीने मालदीवमधील निळ्याशार समुद्रामधील हॉट आणि सेक्सी फोटोशूट तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोमधील तिची मादक अदा पाहून चाहतेही अक्षरश: घायाळ झाले.