#MeToo:तिने माझ्या ओठांचे चुंबन घेतले, मनात लज्जा निर्माण केली; अभिनेत्रीचा अभिनेत्रीवर आरोप
विदोदी अभिनेत्री कनीज सुरका आणि अदिती मित्तल (Photo Credits- Facebook)

#MeToo मोहिमेअंतर्गत व्यक्त झालेल्या एका महिला कलाकाराने केलेला खुलासा पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. खरे तर, #MeToo ही खुलासा नव्हे तर, एक गौप्यस्फोट करणारीच मोहीम मानली जात आहे. या मोहिमेअंतर्गत नुकत्यात एका महिला कलाकाराने दुसऱ्या एका महिला कलाकारांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. आपली इच्छा नसताना तिने आपले चुंबन घेतले. हा प्रकार घडत असताना आपल्याला भलतेच अस्वस्थ वाटल्याचेही या महिला कलाकारने म्हटले आहे. #MeToo अंतर्गत झालेला आतापर्यंतचा हा सर्वात वेगळा प्रकार असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, जगभरात सुरु असलेले #MeTooचे वादळ भारतात येऊन चांगलेच स्थिरावले आहे. #MeTooच्या वादळाने भारतातील भल्याभल्यांच्या नाकी दम आणला आहे. काही मंडळी तर, या वादळाच्या गर्तेत गटांगळ्या खाऊ लागले आहेत. पण, #MeToo मोहिमेअंतर्गत भारतात आतापर्यंत करण्यात आलेले सर्व खुलासे हे बहुदा महिलांनी पुरुषांवर केले आहेत. मात्र, एका महिला कलाकाराने महिला कलाकारविरुद्ध #MeTooअंतर्गत केलेल्या टीप्पणीची ही पहिलीच वेळ असावी.

विनोदी अभिनेत्री कनीज सुरका हीने आपली महिला सहकारी अभिनेत्री अदिती मित्तल हिच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. कनीज सुरकाने म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी अदितीने माझ्या ओठांचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तसेच, चुंबन घेताना तिने आपल्या मर्यादांचे बंधन पाळले नाही. सुमारे १०० प्रेक्षक आणि इतर विनोदी कलाकारांच्या समोर तिने मला लज्जा मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

दरम्यान, कनीज सुरकाच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना अदिती मित्तलने म्हटले आहे की, मी तिच्या ओठांचे चुंबन घेतले. पण, तो केवळ विनोदाचा भाग होता. पण, तरीही तिला असे वाटत असेल की, माझी चुक झाली आहे. तर, त्याबद्द मी माफी मागते.