Bollywood Celebs Support Of Indian Islands: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीपला (Lakshadweep) भेट दिली. पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतात मालदीव (Maldives) आणि लक्षद्वीप (Lakshadweep) ची तुलना सुरू झाली. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहनही केले होते. ही तुलना इतकी वाढली की, मालदीव सरकारलाही काळजी वाटू लागली. आता या प्रकरणाबाबत मालदीवच्या एका मंत्र्याने केलेल्या पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून दोन्ही देशांचे युजर्स आपसात भिडले आहेत.
पीएम मोदींप्रमाणेच अनेक बॉलीवूड स्टार्सही भारतातील या शहराचे नाव घेऊन पर्यटनाला चालना देण्याची मागणी केली आहे. अनेकांनी परदेशात फिरण्यापेक्षा भारतातील ठिकाणे अधिक एक्सप्लोर करण्याची आणि भारतीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची विनंती ट्विटद्वारे केली आहे. मालदीवचे मंत्री अब्दुल्ला मोहजुम मजीद यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'मालदीवच्या पर्यटनाला लक्ष्य करण्यासाठी मी भारतीय पर्यटनाला शुभेच्छा देतो, परंतु भारताला आपल्यातील पर्यटनातून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागेल. आमची एकट्या रिसॉर्टची पायाभूत सुविधा त्यांच्या संपूर्ण पायाभूत सुविधांपेक्षा जास्त आहे. या पोस्टमध्ये पीएम मोदींनाही टॅग करण्यात आले आहे. (हेही वाचा -Government of Maldives on Derogatory Remarks Against PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह वक्तव्यांवर अखेर मालदीव सरकार कडून समोर आली प्रतिक्रिया!)
दरम्यान, मालदीव विरुद्ध लक्षद्वीप यांच्यातील युद्ध जगभर सुरू होताच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही ट्विट करून जनतेला आवाहन केले आणि पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, सलमान खान, श्रद्धा कपूर आणि जॉन अब्राहम यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी मोदींना पाठींबा देणाऱ्या पोस्ट आपल्या X अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत.
सलमान खाननेही या मोहिमेला पाठिंबा देत लिहिले आहे की, आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना लक्षद्वीपच्या सुंदर, स्वच्छ आणि आकर्षक समुद्रकिनाऱ्यांवर पाहून खूप आनंद झाला. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही बेटे आपल्या भारतात आहेत.
It is so cool to see our Hon PM Narendrabhai Modi at the beautiful clean n stunning beaches of Lakshadweep, and the best part is that yeh hamare India mein hain.
— Salman Khan (@BeingSalmanKhan) January 7, 2024
तथापी, अक्षय कुमारने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मालदीवच्या अनेक प्रसिद्ध सार्वजनिक व्यक्तींकडून कमेंट आल्या आहेत, जे भारतीयांबद्दल अत्यंत द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी टिप्पणी करत आहेत. मला खूप आश्चर्य वाटते की ते हे कसे करू शकतात. शेजाऱ्यांशी आपण चांगले आहोत, पण असा विनाकारण द्वेष का सहन करावा? मी अनेक वेळा मालदीवला भेट दिली आहे आणि नेहमीच त्याचे कौतुक केले आहे, परंतु सन्मान प्रथम येतो. चला #IndianIslands एक्सप्लोर करण्याचा आणि स्वतःच्या पर्यटनाला पाठिंबा देण्याचे ठरवूया.
Came across comments from prominent public figures from Maldives passing hateful and racist comments on Indians. Surprised that they are doing this to a country that sends them the maximum number of tourists.
We are good to our neighbors but
why should we tolerate such… pic.twitter.com/DXRqkQFguN
— Akshay Kumar (@akshaykumar) January 7, 2024
तसेच जॉनने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आश्चर्यकारक भारतीय आदरातिथ्य, “अतिथी देवो भव” च्या कल्पनेने आणि विशाल सागरी जीवनाचे अन्वेषण करून, लक्षद्वीप खरोखरचं भेट देण्यासारखे ठिकाण आहे.
With the amazing Indian hospitality, the idea of “Atithi Devo Bhava” and a vast marine life to explore. Lakshwadeep is the place to go.#exploreindianislands pic.twitter.com/CA1d9r0QZ5
— John Abraham (@TheJohnAbraham) January 7, 2024
याशिवाय, बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने लक्षद्वीपचे फोटो शेअर करत पोस्टला कॅप्शन दिलं आहे की, हे सर्व फोटो आणि मीम्स मला खूप उत्तेजित करत आहेत. लक्षद्वीपमध्ये अतिशय सुंदर समुद्रकिनारे आहेत. जी स्थानिक संस्कृती दर्शवते. मी सुट्टीत या ठिकाणी जाते. तर मग यंदा सुट्टीचा आनंद घेण्यासाठी भारतीय बेटाची निवड का करू नये.
All these images and memes making me super FOMO now 😍
Lakshadweep has such pristine beaches and coastlines, thriving local culture, I’m on the verge of booking an impulse chhutti ❤️
This year, why not #ExploreIndianIslands pic.twitter.com/fTWmZTycpO
— Shraddha (@ShraddhaKapoor) January 7, 2024
दरम्यान, कंगना रणौतने लक्षद्वीप विरुद्ध मालदीववरही आपले मत व्यक्त केले आणि तेथील नेत्याने केलेले भारतविरोधी ट्विट शेअर करून तिने उत्तर दिले - वास?? कायमचा वास?? काय!!! एकाच समाजातील असूनही ते मोठ्या प्रमाणावर मुस्लिम भीतीने त्रस्त आहेत. लक्षद्वीपमध्ये ९८ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. मालदीवच्या एका प्रमुख व्यक्तिमत्वासाठी त्यांना दुर्गंधीयुक्त म्हणणे... वर्णद्वेष आणि अज्ञान प्रकट करते. लक्षद्वीपची संपूर्ण लोकसंख्या जेमतेम 60 हजार आहे, याचा अर्थ ते जवळजवळ अस्पर्शित, अज्ञात बेट आहे. इतका ओंगळ आणि असभ्य वर्णद्वेषी असल्याबद्दल लाज वाटते.
Smell?? Permanent smell?? What!!! Suffering from massive Muslim phobia, even though belonging to the same community. Lakshadweep consists of 98 percent of Muslim population, this prominent public figure from Maldives calling them smelly and lowly is rather racist and uninformed.… pic.twitter.com/hLbQvD5RYD
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 7, 2024
तथापी, यूजर्सही या स्टार्सला त्यांच्या पोस्टवर कमेंट करून सपोर्ट करत आहेत. परदेशात जाण्याऐवजी प्रत्येक भारतीय प्रथम भारतीय पर्यटन स्थळे शोधून भारतीय पर्यटनाला चालना देण्याविषयी बोलत आहे.