
Shine Tom Chacko Arrest: शनिवारी मल्याळम अभिनेता शाईन टॉम चाकोला (Shine Tom Chacko) ड्रग्ज वापराच्या आरोपाखाली अटक (Arrest) करण्यात आली. अलिकडेच अभिनेत्री विन्सी अलोशियसने आरोप केला आहे की, शाईन टॉम चाकोने चित्रपटाच्या सेटवर ड्रग्ज घेतल्यानंतर तिच्याशी गैरवर्तन केले. पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी शाईनने पळून जाण्याचा प्रयत्नही केला, परंतु पोलिसांनी या प्रकरणात त्याला अटक केली. अलोशियसने अलीकडेच मल्याळम अभिनेता शाईन टॉम चाकोविरुद्ध केरळ फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स आणि चित्रपट उद्योगाच्या अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार दाखल केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री विन्सी अलोशियस गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीतील वाईट अनुभवांबद्दल बोलताना विन्सीने अलीकडेच एक खुलासा केला. ज्यामध्ये तिने एका चित्रपटात काम करताना एक सह-अभिनेता तिच्याशी कसा वागला हे सांगितले. या व्हिडिओमध्ये विन्सीने सांगितले की, 'आम्ही एका चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो. रिहर्सल दरम्यान एक सहकलाकार माझ्यासोबत होता. आम्ही त्या दृश्याची तालीम करत होतो. या वेळी, त्याच्या तोंडातून टेबलावर काहीतरी पांढरे पडले, जे ड्रग्जसारखे दिसत होते. ड्रग्जच्या नशेत त्याने माझ्याबद्दल काही अश्लील गोष्टी सांगितल्या. अभिनेत्रीच्या या व्हिडिओनंतर, हे प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय बनले.
View this post on Instagram
दरम्यान, विन्सीने 14 एप्रिल रोजी तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आणि सर्वकाही सविस्तरपणे सांगितले. यानंतर, विंचीने तिच्या सह-कलाकाराविरुद्ध आयसीसी म्हणजेच अंतर्गत तक्रार समिती आणि मल्याळम चित्रपट कलाकारांच्या संघटनेकडे तक्रार दाखल केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही त्याची दखल घेतली आणि आता आरोपी अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर करण्यात आली कारवाई -
विन्सीच्या आरोपांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या. ज्यामध्ये लोकांनी अशा लोकांना ताबडतोब धडा शिकवण्याबद्दल बोलले होते. त्याच वेळी, काही चाहत्यांनी म्हटले होते की, दोन्ही लोकांच्या विधानांची योग्य तपासणी केली पाहिजे आणि त्यानंतरच सत्याबद्दल मत तयार केले पाहिजे.