Ludo Netflix Film Leaked on TamilRockers & Torrent: पंकज त्रिपाठी- अभिषेक बच्चन स्टारर 'लूडो' ला पायरसीचे ग्रहण; रिलीज होताच काही तासांत सिनेमा लीक
Ludo Film (Photo Credits: Instagram)

Ludo Netflix Film Leaked on Tamil Rockers & Torrent: अनुराग बसु (Anurag Basu) यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'लूडो' (Ludo) आज (12 नोव्हेंबर) नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज करण्यात आला. या सिनेमात अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आणि राजकुमार राव (Rajkummar Rao) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, हा सिनेमा रिलीज होताच काही तासात ऑनलाईन पायरसीला बळी पडला. तामिळरॉकर्स (Tamil Rockers) आणि टॉरेंट (Torrent) सारख्या पायरेटेट साईट्सवर हा सिनेमा लीक झाला असून एचडी आणि अन्य फॉर्मेटमध्ये तो डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

कोरोना व्हायरस संकटामुळे हा सिनेमा ऑनलाईन नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला. लोक इंटरनेटवर लुडो मुव्ही फ्री डाऊनलोड (Ludo Movie Free Download), लूडो मुव्ही एचडी डाऊनलोड (Ludo Movie HD Download) यांसारख्या किवर्ड्सने गुगल सर्च करत आहेत. (Breathe Into the Shadows Leaked: अभिषेक बच्चन याची पहिली वेबसिरीज 'ब्रीद: इनटू द शॅडोज' पायरसीला बळी; Telegram आणि TamilRockers सर्व एपिसोड्स उपलब्ध)

पहा सिनेमाचा ट्रेलर:

यापूर्वी अभिषेक बच्चन याची पहिली वेबसिरीज 'ब्रीद: इनटू द शॅडोज' पायरसीला बळी पडली होती. त्याचबरोबर बॉबी देओल याचा 'आश्राम 2' हा सिनेमा देखील पायरसीला बळी पडला होता. तसंच यापूर्वी अनेक सिनेमांना या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, पायरसी हे मनोरंजन विश्वाला लागलेले ग्रहण आहे. याच्या जाळ्यात अनेक सिनेमे, वेब सिरीज अडकले आहेत. पायरसीला आळा घालण्याचे शर्थीचे प्रयत्न निर्माते आणि चित्रपटसृष्टीकडून केले जात आहेत. अनेक प्रयत्नांनंतरही पायरेटेट व्हर्जन पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र हे चुकीचे असल्याने याबद्दलची सजगता वाढवून हे रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.