Abhishek Bachchan in Breathe Into the Shadows (Photo Credits: Twitter)

अॅमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) रिलीज झालेली सुपरस्टार अभिषेक बच्चन याची वेबसिरीज ब्रीद: इनटू द शैडोज (Breathe Into the Shadows) इंटरनेटवर लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याची ही पहिलीवहिली वेबसिरीज असून या अभिषेकसह नित्या मेनन (Nithya Menen) आणि अमित साध (Amit Sadh) प्रमुख भूमिकेत आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवरील अभिषेकची ही पहिलीवहिली एन्ट्री असून या वेबसिरीजमध्ये त्याने डॉ. अविनाश सब्रवाल नामक सायकायट्रिसची भूमिका साकारली आहे. अमित साध हा कबीर सावंत नामक एका इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे. Choked या वेब फिल्म मधील अभिनेत्री सय्यामी खैर ही सुद्धा या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे.

ब्रीद: इनटू द शैडोज ही वेबसिरीज अॅमेझॉन प्राईमवर 10 जुलै रोजी रिलीज झाली असून याची सोशल मीडियावर चर्चा आहे. दरम्यान ही नवीकोरी वेबसिरीज पायरसीला बळी पडली आहे. या वेबसिरीजचे सर्व एपिसोड्स आता एचडीमध्ये लिक झाले आहेत. स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या अनेक वेबसिरीजवर सध्या पायरसीचे संकट मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अभिषेक बच्चन आणि अमित साध यांच्या या वेबसिरीजचे सर्व 12 एपिसोड ऑनलाईन लिक झाले आहेत. (अनुष्का शर्मा चा चित्रपट 'बुलबुल' अडकला पायरसीच्या जाळ्यात; लीक झाल्यानंतर होत आहेत Free Download)

काल रिलीज झालेली वेबसिरीज एका दिवसात ऑनलाईक लीक झाली असून वेगवेगळ्या टर्म्ससह ती सर्च केली जात आहे. Breathe Into The Shadows Season 2 Full Movie Download, Breathe Into The Shadows Season 2 Tamilrockers, Breathe Into The Shadows Season 2 Tamilrockers HD Download, Breathe Into The Shadows Season 2 Movie Download Tamilrockers, Breathe Into The Shadows Season 2 Telegram, Breathe Into The Shadows Season 2 Telegram links, Breathe Into The Shadows Season 2 Full Movie HD Telegram, Breathe Into The Shadows All Episodes Download 480p या किवर्ड्सने वेबसिरीज सर्च होत आहे, रिपोर्ट्सनुसार, याचे 480p, 720p, 1080p Web-DL, HD-Rip, Br-Rip व्हर्जन उपलब्ध आहे. पायरसी रोखण्याचे अनेक प्रयत्न केले जात असूनही नवे सिनेमे, वेबसिरीज पायरसीला बळी पडत आहेत.