Love Aaj Kal Box Office Report: कार्तिक- सारा चा लव्ह आज कल दोन दिवसातच आपटला; आतापर्यंत कमावले केवळ 'इतके' कोटी
Love Aaj Kal (Photo Credits: Instagram)

सारा अली खान (Sara Ali Khan) आणि कार्तिक आर्यन (Kartik Aryaan) यांचा लव आज कल (Love Aaj Kal) सिनेमा चित्रीकरणा पासूनच जबरदस्त चर्चेत होता. कॉफी विथ करण (Coffee With Karan) मध्ये सारा ने आपल्याला कार्तिक आर्यनला डेट करायचंय म्हंटल्यावरच ही जोडी ऑनस्क्रीन कशी दिसेल याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती, मध्यंतरी ही जोडी तर खरोखऱच डेट करत असल्याच्याही चर्चा होत्या एकूणच काय तर सिनेमाला हिट होण्यासाठी लागणारी उत्सुकता अगोदरपासूनच तयार करून ठेवण्यात आली होती, मात्र तरीही सिनेमाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचेच आता म्हणावे लागत आहे. लव आज कल सिनेमाने प्रदर्शनच्या नंतर पहिल्याच वीकएंड ला केवळ 28. 51 कोटी कमावले आहेत. 'सारा अली खान' आणि 'कार्तिक आर्यन'चा Kissing व्हिडिओ सोशल मीडियात झाला लीक (Video)

चित्रपट व्यवसाय समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. लव्ह आज कल सिनेमा व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला सिनेमाने पहिल्या दिवशी 12.4 कोटी तर दुसऱ्या दिवशी केवळ 8. 01 कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान यांच्या लव्ह आज कल च्या पहिला भागाने 2009 मध्येच 27. 86 कोटींची कमाई केली होती.

पहा पोस्ट

दरम्यान. या सिनेमात एक मॉर्डन आणि एक 90 ची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमाचं कलेक्शन पाहून प्रेक्षकांनी सिनेमाकडे सपशेल पाठ फिरवली असंच म्हणावं लागेल. कमी स्टार आणि प्रेक्षकांकडून सिनेमाबद्दल वाईट रिव्ह्यू मिळाल्याने लव आज कलच्या कमाईला ब्रेक लागल्याचे समजत आहे. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्यासोबत रणदीप हुड्डा आणि आरूषी शर्मा अशी मंडळी असतानाही सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकलेला नाही.