Sara Ali Khan and Kartik Aaryan's leaked KISSING scene (Photo Credits: Instagram and Twitter)

कॉफी विथ करणच्या सीझन 6 (KWK6)  मध्ये सारा अली खानने (Sara Ali Khan) तिला कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) डेट करायचयं असं जाहीर सांगितलं आणि आता हे दोघं लवकरच रूपेरी पडद्यावर रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. ऑफ स्क्रीन केमेस्ट्रीबद्दल ठाऊक नसलं तरीही इम्तियाझ अलीच्या  (Imtiaz Ali)  आगामी 'लव आज कल 2' (Love Aaj Kal 2) या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये लीक झाला आहे. हा एक इंटिमेट व्हिडिओ असून त्यामध्ये सारा अली खान आणी कार्तिक आर्यन एकमेकांना किस करत आहेत. कार्तिक आर्यनला डेट करण्याच्या सारा अली खानच्या इच्छेवर कार्तिकचं Cute उत्तर ! (Video)

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्यावर एक रोमॅन्टिक सॉंग़ चित्रित होत असतानाचा हा एक व्हिडिओ आहे. यामध्ये बॅकग्राऊंडला रोमॅन्टिक गाणं वाजत आहे. दरम्यान सारा अली खान आणि कार्तिक आर्यन किस करत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होत आहे.

सारा अली खानने 'सिम्बा' आणि 'केदारनाथ' हे दोन सुपरहीट सिनेमे दिले आहेत. तर कार्तिक आर्यनचा 'लुका छुपी' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. सध्या बॉक्सऑफिसवर या सिनेमाने 45.07 कोटीचा गल्ला जमवला आहे.