कार्तिक आर्यनला डेट करण्याच्या सारा अली खानच्या इच्छेवर कार्तिकचं Cute उत्तर ! (Video)
सारा आणि कार्तिक आर्यन photo credit : Instagram

स्टार किड आणि त्यातही बॉलिवूडमध्ये पदार्पण असेल तर त्या 'व्यक्ती'ला एका विशिष्ट नजरेतून पाहिलं जातं. पण Koffee With Karan Season 6 मध्ये सैफ (Saif Ali Khan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) च्या गप्पा ऐकून अनेकांच्या डोक्यात असलेली सारा अली खानची त्यांच्या डोक्यात असलेली इमेज गळून पडली असेल. बोल्ड, बिनधास्त तरीही तिच्या वयापेक्षा खूपच समजूतदार सारा अली खानने गप्पाच्या ओघात तिला कार्तिक आर्यनला (Kartik Aryan)  डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आता कार्तिक आर्यनचाही यावर रिप्लाय आला आहे.

 

View this post on Instagram

 

#saraalikhan #saifalikhan #koffeewithkaran #daddyanddaughter #daddysforeverprincess

A post shared by Shaheen__Parwaan (@shaheen__parwaan) on

कार्तिक आर्यनला(Kartik Aryan) मीडियाच्या माध्यमातून एका अवॉर्ड शो दरम्यान साराच्या इच्छेबद्दल समजलं. सुरुवातीला कार्तिक थोडासा गोंधळला होता. सारा अली खान (Sara Ali Khan) खुपच छान दिसते, भविष्यात तिच्यासोबत काम करायला आवडेल असे तो म्हणाला. पण डेट बद्द्ल काय? असा मीडियाने प्रश्न विचारताच, तिच्यासोबत कॉफी प्यायला जायला आवडेल असे उत्तर दिले आहे. साराने कार्तिक सोबत डेटवर तर रणबीर कपूरसोबत लग्न करायला आवडेल असं म्हटलं होतं.

 

View this post on Instagram

 

Will you date to me lol....#kartikaaryan * * * Follow for more updates @the_blur_house

A post shared by THE BLUR HOUSE (@the_blur_house) on

'सोनू की टीटू की स्वीटी' या सिनेमातून कार्तिक आर्यन लोकांपर्यंत विशेष पोहचला. तर सारा अली खान(Sara Ali Khan) 'केदारनाथ' (Kedarnath) सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. केदारनाथ पाठोपाठ सारा रोहित शेट्टीच्या 'सिम्बा'(Simmba) सिनेमातही दिसणार आहे. सारा अली खान ही सैफची पहिली पत्नी अमृतासिंगची मुलगी आहे.