Anupam Kher, Kirron Kher | (Photo Credit: Facebook / Kirron Kher 14)

Lok Sabha Elections 2019: ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या पत्नी आणि विद्यमान भाजप खासदार किरण खेर (Kirron Kher) यांनी लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Election 2019) साठी पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरला. भाजपने त्यांच्यासाठी चंडीगढ लोकसभा मतदारसंघ (Chandigarh Sabha Constituency)  निवडला आहे. खेर यांनी नुकताच आपल्या उमेदवारी अर्जही दाखल केला. निवडणूक अर्जासोबत त्यांनी आपल्या एकूण संपत्तीबाबतचे प्रतिज्ञापत्रही जोडले. किरण खेर यांनी निवडणूक उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रानुसार त्यांची संपत्ती पती अनुपम खेर यांच्यापेक्षा दुप्पट आहे. किरण खेर यांच्याकडे तब्बल 16 किलो इतक्या वजनाचे सोन्याचे दागिणे आहेत. या 16 किलोंमध्ये गेल्या पाच वर्षांत 4 किलोची भर पडली आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये किरण खेर यांची जंगम मालमत्ता तबबल 9.23 कोटी रुपयांनी वाढली आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खेर यांनी जाहीर केलेल्या संपत्तीत सोने दागिणे12 किलो आणि चांदी 8 किलो इतके दर्शवले होते. या वेळी सोन्याच्या दागिण्यांमध्ये वाढ होऊन ते 16 किलो इतके झाले आहेत. तर, चांदिचे दागिणे स्थिर आहेत. किरण खेर यांच्या कडे सर्व मिळूण एकूण 4.63 कोटी रुपयांचे दागिणे आहेत. पाठिमागील लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत या वेळी खेर यांची संपत्ती चांगलीच वाढली आहे. गेल्या वेळी खेर यांनी आपली संपत्ती 7.69 कोटी इतकी असल्याचे दर्शवले होते. या वेळी वाढ होऊन ती 9.28 कोटी रुपयांनी वाढून ती तब्बल 16.97 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान किरण खेर यांच्या स्थावर मालमत्तेत मात्र घट झाल्याचे दिसते. (हेही वाचा, कुबेराचे वरदान, लक्ष्मीचे लोटांगण; पाहा भारतात श्रीमंतांची संपत्ती किती वाढली? भुकेला गरीब कर्जाच्या विळख्यात)

2014 मध्ये किरण खेर यांची स्थावर मालमत्ता 16.19 कोटी रुपये होती. आता त्यात घट होऊन ती 13.91 कोटी इतकी झाली आहे. किरण खेर यांचे पती अनुपम खेर यांच्याजवळ 16.61 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर, किरण खेर यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे अनुपम यांच्या तुलनेत एकूण 30.88 कोटी रुपयांची संपत्ती आहे. किरण खेर यांनी 1973 मध्ये पंजाब विद्यापीठातून इग्रजी विषयात एमए केले आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांचा सामना काँग्रेसचे वरिष्ठ नेते पवन बन्सल यांच्याशी होणार आहे.