कुबेराचे वरदान, लक्ष्मीचे लोटांगण; पाहा भारतात श्रीमंतांची संपत्ती किती वाढली? भुकेला गरीब कर्जाच्या विळख्यात
Wealth Of 9 Richest Indians Equivalent To Bottom 50% Of Country: Report | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

देशातील गरीब-श्रीमंत यांच्यातील मोठी दरी एका सर्व्हेतून पुढे आहे. सन 2018मध्ये भारतात अब्जाधीशांच्या संपत्तीत प्रतिदिन 2,200 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. म्हणजेच श्रीमंतांच्या संपत्तीत 2018 मध्ये 39 टक्क्यांची वाढ झाली. तर, याउलट देशातील सर्वात गरीब मानल्या जाणाऱ्या लोकांच्या सपत्तीत केवळ 3 टक्क्यांची वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ऑक्सफॅम (OXFAM India)या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणात ही माहिती पुढे आली. भारतातील केवळ 9 श्रीमंत घरांकडे देशातील लोकसंख्येच्या एकूण संपत्तीइतकासंपत्ती संचय झाल्याचेही ऑक्सफॅमचा अहवाला सांगतो.

जागतिक पातळीवर 2018 मध्ये करोडपतींच्या सपत्तीत सुमारे 12 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. तर, सर्वात गरीब मानल्या जाणाऱ्या लोकांच्या संपत्तीत 11 टक्क्यांची घसरणच पाहायला मिळाली. दावोस (Davos) येथे 5 दिवसीय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे आयोजन करण्यात आले आहे. या फोरमला सुरुवात होण्यापूर्वी एक दिवस आगोदर ऑक्सफॅमने ( World Economic Forum ) आपला सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, भारतातील सर्वात गरीब 10 टक्के म्हणजेच जवळपास 13.6 कोटी जनता 2004 पासून सातत्याने कर्जाच्या खाईत लोटली गेली आहे. ही जनता सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे.

दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी (WEF) उपस्थित राहणाऱ्या सर्व राजकीय नेते, कार्यकर्ते आणि प्रतिनिधींना ऑक्सफॅमने अवाहन केले आहे की, त्यांनी गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी करण्यासाठी काम करावे. वाढत्या गरीबीने जागतीक अर्थव्यवस्थेसमोरही मोठे आव्हान निर्माण केले आहे. भविष्यात हे आव्हान अधिक विक्राळ रुप धारण करेन असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे. (हेही वाचा, मोदी सरकारकडून मध्यमवर्गीयांना मिळू शकते ही भेट; जाणून घ्या काय असेल अर्थसंकल्पाचे वैशिष्ठ्य)

ऑक्सफॅम इंटरनॅशनल एग्झीक्युटीव्ह विनी ब्यानिमा यांनी सांगितले की, नैतिकदृष्ट्या सांगायचे तर ही दरी अत्यंत वेदनादाई आहे. भारतात, गरिबांची दुर्दशा इतकी वाईट आहे की, त्यांना दोनवेळच्या आन्नाचीही भ्रांत आहे. दुसऱ्या बाजूला श्रीमंतांच्या संपत्तीत दिवसेंदिवस अधिकच भर पडत आहे. हे अंतर जर असेच वाढत राहिले तर, सामाजिक व्यवस्थाच धोक्यात येऊ शकते.

दरम्यान, जगातील 3.8 बिलियन गरीब लोकांकडे जितकी एकूण संपत्ती आहे तेवढी संपत्ती केवळ 26 लोकांकडे आहे. उदाहरणादाखल वास्तव घ्यायचे तर, अॅमेझॉन या कंपनीचा संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बोझेस यांच्या संपत्तीची तुलना केली तर ती इथिओपीया या देशाच्या वार्षीक आरोग्य अर्थसंकल्पाइतकी आहे. यावरुन गरीब श्रीमंती यांच्यातील तफावत आपल्या ध्यानात येऊ शकेल.