
आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीत एक खास स्थान निर्माण करणाऱ्या कंगना राणौतला (Kangana Ranaut) कोणत्याही इतर ओळखीची गरज नाही. सिनेविश्वात क्वीन म्हणून ओळखली जाणारी ही अभिनेत्री तिच्या अप्रतिम चित्रपटांसोबतच तिच्या खास शैलीसाठी ओळखली जाते, ज्यामुळे तिचा अनेकदा वादांचा सामना करावा लागतो. सध्या जरी कंगनाला तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे बॉलिवूडची ‘क्वीन’ समजले जात असले तरी, एकेकाळी तिला ‘चेटकीण’ संबोधले जायचे.
होय, कंगनाला एकदा एका संपादकाने 'काळी जादू करणारी डायन' असे संबोधले होते. त्यावेळची ही आठवण कंगनाने सोशल मिडियावर शेअर केली आहे. आपल्या एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने एका एडिटरबद्दल माहिती दिली दिली आहे, ज्याने एकेकाळी कंगनाच्या 'ब्लॅक मॅजिक स्किल्स'बद्दल भाष्य केले होते.
कंगनाने लिहिले- ‘2016 मध्ये एका संपादकाने लिहिले होते की, यश मिळवण्यासाठी मी काळ्या जादूचा अवलंब केला, आधार घेतला. कारकीर्दीमध्ये पुढे जाण्यासाठी मी माझे पीरियड रक्त मिसळून लाडू बनवले आणि दिवाळी भेट म्हणून वाटले’. स्वतःबद्दल लिहिल्या गेलेल्या अशा गोष्टींबद्दल कंगनाने सांगितले की, ज्या दिवसांत ती काळी जादू करत असल्याच्या अनेक बातम्या येत होत्या. (हेही वाचा: जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत अभिनेत्री दिपीका पदूकोणचा समावेश, सर्वात सुंदर 10 महिलांच्या समावेश असलेली दिपीका एकमेव भारतीय महिला)
ती पुढे म्हणते, ‘कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नाही, एजन्सी, बॉयफ्रेंड नसतानाही ती ज्या प्रकारे मेहनतीने शीर्षस्थानी आली त्याला सर्वांनी एकत्रितपणे 'काळी जादू' असे संबोधले.’ कंगनाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सद्गुरु सांगतात की 200 वर्षांपूर्वी महिलांना चेटकीण समजले जात असल्याने त्यांना जिवंत जाळण्यात आले होते. या क्लिपसोबत कंगनाने लिहिले, ‘जर तुमच्याकडे सुपर पॉवर असेल तर तुम्हाला डायन म्हटले जाते... मला पण डायन म्हटले जायचे पण मी त्यांना मला जाळू दिले नाही.’