Deepika Padukone: जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत अभिनेत्री दिपीका पदूकोणचा समावेश, सर्वात सुंदर 10 महिलांच्या समावेश असलेली दिपीका एकमेव भारतीय महिला
जगातील सर्वात सुंदर 10 महिलांच्या यादीत महिलाच्या यादीत अभिनेत्री दिपिका पदूकोणचा समावेश करण्यात आला आहे.
अभिनेत्री दिपिका पदूकोण (Deepika Padukone) सध्या यशाच्या शिखरावर. सौदर्य, पैसा,नाव, प्रसिध्दने श्रीमंत असलेल्या दिपीका पुन्हा एका बाबतीत वरचढ ढरली आहे. जगातील सर्वात सुंदर 10 महिलांच्या यादीत महिलाच्या यादीत अभिनेत्री दिपिका पदूकोणचा समावेश करण्यात आला आहे. गोल्डन रेशो ऑफ ब्यूटी नुसार (golden ratio of beauty) जगभरातील एकूण दहा महिलांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. भारतीय अभिनेत्री दिपिका पदुकोण या एकमेव महिलेचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. तरी दिपीका जगातील सर्वात सुंदर महिलांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. जोडी कॉमरला ही जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून घोषित करण्यात आलं असुन तिने यांत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर बियॉन्से आणि किम कार्दशियन यांचा देखील या टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे.
चेहर्यावरील घटक परिपूर्ण गुणोत्तरच्या (golden ratio of beauty) माध्यमातून जगातील सर्वात सुंदर महिला कोण हे ठरवण्यात येत. या गुणोत्तरानुसार यूनायटेड किंगडमच्या (United Kingdom) प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ ज्युलियन डी सिल्वा यांनी जोडी कॉमरला सर्वात सुंदर महिला म्हणून घोषित केले कारण तिच्या समान आहे. तर हॉलिवूड अभिनेता झेंडाया आणि मॉडेल बेला हदीद यांनी यांत दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. (हे ही वाचा:- Alia Bhatt: करिअरच्या पीकवर असताना अभिनेत्री आलिया भट्ट कामातून घेणार तब्बल एक वर्षाचा ब्रेक)
जगातील सर्वात सुदर महिलांच्या यादीत झेंडाया (94.37% गुणोत्तरासह आणि बेला हदीद 94.35% गुणोत्तर गाठत तिसरा क्रमांक पटकवला आहे. या टॉप तिन महिलांपाठोपाठ बेयॉन्सेने चौथा, एरियाना ग्रांडेने पाचवा, टेलर स्विफ्ट सहाव्या क्रमांकावर आहे. जॉर्डन डन हिने सातवा क्रमांक पटकावला असुन किम कार्दशियन (91.28%) सह आठव्या क्रमांकावर आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण नवव्या आणि हो योन जंग दहाव्या क्रमांकावर आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2022 04:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

