Kartik Aaryan Donates 1 lakh To PM Cares Fund (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus)  विळख्यात अडकलेल्या देशाला बाहेर काढण्यासाठी देशाची आर्थिक बाजू मजबूत करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना शक्य असेल तितकी मदत करण्याचे आवाहन केले आहे. याकरिता खास पीएम केअर्स फंडची (PM Cares Fund) सुद्धा निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंत मोठमोठे उद्योगपती,खेळाडू , राजकीय मंडळी, सरकारी कर्मचारी आणि सर्व स्तरातील नागरिकांनी या फंड साठी योगदान दिले आहे. यात आता बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan)  याने सुद्धा पुढाकार घेऊन आपल्यातर्फे 1 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. कार्तिकने स्वतः याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. (Coronavirus: कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी टाटा ट्रस्टकडून 500 कोटींची मदत जाहीर)

कार्तिकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम केअर्स फंड संबंधी ट्विट ला रिप्लाय करत आपण १ कोटी रुपयांची मदत पीएम केअर्स फंड मध्ये देत आहोत असे सांगितले आहे. " या संकटाच्या वेळी सर्व देशाने एकत्र येण्याची गरज आहे, मी आज जो काही आहे, जितके पैसे कमावले आहे ते सर्व भारतीयांच्या मदतीनेच शक्य झाले आहे, त्यामुळे यातीलच एक भाग म्हणजेच १ कोटी रुपये मी देशाच्या मदतीसाठी देत आहे" असे ट्विट कार्तिकने केले आहे. तसेच इतर देशवासीयांनी सुद्धा शक्य होईल तितकी मदत करावी असेही आवाहन कार्तिकने केले आहे.

कार्तिक आर्यन ट्विट

दरम्यान, आतापर्यंत बॉलिवूड मधील अनेक मंडळींनी मोठे योगदान दिले आहे. यापैकी अक्षय कुमार याने सर्वाधिक म्हणजेच 25 कोटी रुपयांचे योगदान पीएम केअर्स फंड साठी दिले आहे. यापूर्वी कार्तिक आर्यांच्या लॉक डाऊन काळात नागरिकांनी बाहेर पडू नये असे सांगताना आपल्या खास शैलीत एक व्हिडीओ शेअर केला होता, या व्हिडीओवरून स्वतः नरेंद्र मोदी यांनी सुद्धा कार्तिकचे कौतुक केले होते.