Akshay Kumar (Image Credit: Yogen Shah)

देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मात्र या परिस्थितीत कोरोनाबाधित आणि गरिब लोकांची विविध स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एकमेकांना मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य व्यक्ती ते बड्या उद्योगजकांपर्यंत कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. तर आता अभिनेता अक्षय कुमार याच्याकडून पीएम केअर्स फंडसाठी 25 कोटींची जाहीर केली आहे.

अक्षय कुमार याने असे म्हटले आहे की, सध्या लोकांचे जीवन हे महत्वाचे असून त्यांच्यासाठी आवश्यक ते सर्वकाही करणे गरजेचे आहे. त्याचमुळे मी 25 कोटी रुपये माझ्या सेविंग मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या PM-CARES fund साठी देत असल्याचे अक्षयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे चला लोकांचे जीव वाचवू कारण जान तो जान असे ही त्याने म्हटले आहे.(Coronavirus: कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी टाटा ट्रस्टकडून 500 कोटींची मदत जाहीर)

तसेच अभिनेता सनी देओल आणि भाजप खासदार यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचा सामना करताना माझ्या लोकसभा मतदार संघातील गुरुदासपूर आरोग्य विभागाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी मी खासदार निधीतून 50 लाखांची मदत करत असल्याचे सांगितले आहे. याशिवाय गुरुदासपूर मतदारसंघातील सर्व नागरिकांना सरकारने दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असेही म्हटले आहे.