Aamir Khan च्या वाढदिवसानिमित्त Kareena Kapoor ने सोशल मिडियावर शेअर केला खास फोटो, म्हणाली, Happy Birthday My Lal
Aamir Khan Birthday (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) हा आज आपला 56 वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील त्याचे असंख्य चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. त्याचबरोबर त्याचा मित्रपरिवार, बॉलिवूडमधील कलाकारही त्याला सोशल मिडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. दरम्यान अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) याने थोड्या हटके अंदाजात आपल्या सहकलाकाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करीना कपूर हिने सोशल मिडियावर आमिरचा एक फोटो शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करीना कपूरने आमिर आणि तिचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' मधील आमिरचा एक फोटो शेअर करुन 'हॅप्पी बर्थडे माझा लाल' असे लिहित वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.हेदेखील वाचा- Deepika Padukone आणि Kriti Sanon नंतर Kareena Kapoor Khan बनणार 'सीता', या चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या नावाची चर्चा; वाचा सविस्तर वृत्त

"तुझ्यासारखा कोणी नाही. तुझ्या या हि-यासारख्या चित्रपटात तू जी जादू पसरवली आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी जास्त वाट पाहू शक नाही." असे कॅप्शन करिनाने या पोस्टखाली लिहिले आहे.

आमिरचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' मध्ये करीना कपूर आमिरसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ही जोडी 7 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे.

'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक आहे. 2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथा मराठमोळ्या अतुल कुलकर्णीने लिहिली आहे. या चित्रपटात आमिर खान एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे.