Deepika Padukone आणि Kriti Sanon नंतर Kareena Kapoor Khan बनणार 'सीता', या चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या नावाची चर्चा; वाचा सविस्तर वृत्त
अलौकिक देसाई यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मला आणि केवी विजयेंद्र प्रसाद यांना सीताच्या भूमिकेसाठी करीना परिपूर्ण वाटते. करीना या भूमिकेसाठी उत्तम अभिनेत्री ठरेल.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) च्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. यापूर्वी 'सीता' (Sita) संबंधित काही चित्रपटांची घोषणा झाली आहे आणि त्याबरोबर सीतेची भूमिका साकारणार्या अभिनेत्रींचे नावेदेखील समोर आले आहेत. सीता बनलेल्या अभिनेत्रींमध्ये आता करीना कपूर खान हे नवीन नाव जोडले गेले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अलौकिक देसाईंनी त्यांचा आगामी सिनेमा 'सीता-द इनकार्नेशन' ची घोषणा केली होती. चित्रपटाच्या घोषणेनंतर सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध सुरू होता. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, सीताच्या भूमिकेसाठी आता करीना कपूर खानचे नाव निश्चित झाले आहे. परंतु अद्याप या नावावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर जर करीनाने या चित्रपटास नकार दिला तर ही भूमिका साकारण्यासाठी आलिया भट्टचा विचार केला जाऊ शकतो. (वाचा - Akshay Kumar चा सूर्यवंशी सिनेमा 'या' दिवशी होणार रिलीज?)
आलिया भट्ट च्या नावाचीही चर्चा -
अलौकिक देसाई यांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मला आणि केवी विजयेंद्र प्रसाद यांना सीताच्या भूमिकेसाठी करीना परिपूर्ण वाटते. करीना या भूमिकेसाठी उत्तम अभिनेत्री ठरेल. या चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी आलिया भट्ट च्या नावाचाही विचार केला जात आहे. परंतु, करिना ही निर्मात्यांची पहिली पसंती आहे आणि त्यासाठी तिलाही संपर्क करण्यात आला आहे.
अलौकिक देसाई यांनी पुढे बोलताना सांगितलं की, करिनालासुद्धा या चित्रपटाची संकल्पना आवडली आहे. कारण, तिला रामायण आधारित इतर चित्रपटांपेक्षा अधिक स्क्रीन टाइम मिळणार आहे. कारण, हा संपूर्णपणे सीतेच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे आणि यात तिचे मुख्य पात्र असणार आहे. सध्या करीनाची टीम शुटिंगच्या तारखा आणि शुल्काबाबत काम करत आहे. सर्व औपचारिकता पूर्ण होताच अधिकृत घोषणा केली जाईल. करीनाने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला तर आमची दुसरी निवड आलिया भट्ट असेल.
With grace of Goddess Lakshmi I am thrilled to announce my dream project, SITA- The Incarnation. It’s a pleasure to have #KVVijendraPrasad Sir as writer and @manojmuntashir Sir for Dialogue and Lyrics.
🙏🏻Jai Sita Ram🙏🏻 #Sita_the_incarnation pic.twitter.com/DnrSyUL071
— Alaukik Desai (@alaukikdesai) February 25, 2021
कृती सेनन आणि दीपिकाही बनणार सीता -
अलीकडेच कृती सेनन ओम राऊतच्या 'आदिपुरुष' चित्रपटात दिसणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या चित्रपटात प्रभास, भगवान राम आणि कृती सॅनन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सैफ अली खान या चित्रपटात लंकेशची भूमिका साकारणार आहेत. करीना कपूर खान आणि कृती सेनन यांच्यासह मधु मंटेना यांच्या रामायण 3 डी व्हर्जनमध्ये दीपिका पादुकोण सीतेच्या भूमिकेत दिसू शकते.
(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2021 11:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

