Kareena Kapoor चे प्रेग्नेंसीवरील पुस्तक Pregnancy Bible लॉन्च (Watch Video)
Kareena Kapoor Khan (Photo Credits: Instagram)

करीना कपूर (Kareena Kapoor) हिची ओळख आता केवळ बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री अशी राहिलेली नसून तैमूरची आई अशी देखील झाली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये करीनाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर वाढलेली जबाबदारी सांभाळत वर्क-लाईफ बॅलन्सिंग तिने अगदी उत्तम केले. प्रेग्नेंसी काळातही तिचे लूक्स, तिच्या डाएट, योगाच्या पोस्टने अनेकांची मने जिंकली. यामुळेच दोन प्रेग्नेंसीचा अनुभव असलेल्या करीनाने आता त्यावर पुस्तक लिहिले आहे. त्यात तिने प्रेग्नेंसीचा अनुभव आणि त्यासंबंधित टिप्स शेअर केल्या आहेत. या पुस्तकाचे नाव प्रेग्नेंसी बायबल (Pregnancy Bible).

करीनाने हे पुस्तक इंटरनेटवर लॉन्च केले आहे. त्याचबरोबर आज एक पोस्ट करत तिने खास शैलीत आपल्या पुस्तकाबद्दल माहिती दिली आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, करीना कपूर आपल्या किचनमध्ये काम करत आहे. मध्येच ती ओव्हनमधून एक पुस्तक बाहेर काढते आणि म्हणजे ही गोष्ट गेल्या काही दिवसांपासून बेक होत होती. व्हिडिओला कॅप्शन देताना करीनाने लिहिले की, यात मी प्रेग्नेंसीचे सर्व चांगले आणि वाईट अनुभव शेअर केले आहेत. जे तुम्हाला नक्कीच कामी येतील.

पहा व्हिडिओ:

पुढे ती म्हणते की, गर्भावस्थेत होणारे शारीरिक आणि मानसिक अनुभव या पुस्तकात शेअर केले आहेत. हे पुस्तक मला माझ्या तिसऱ्या बाळाप्रमाणे आहे. त्याचबरोबर करीनाने पुस्तक प्री-ऑर्डर करण्याबद्दलही माहिती दिली आहे. दरम्यान, लवकरच करीना आमिर खान सोबत 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.