फाटलेल्या जीन्सवरुन अक्कल शिकवणारी कंगना रनौत सध्याच्या ट्रान्सपरेंट ब्रालेट मधील फोटोंमुळे सोशल मीडियातील ट्रोल (See Photo)
कंगना रानौत (Photo Credits: Instagram)

नेहमीच वादाच्या कचाट्यात सापडणारी बॉलिवूड मधील क्विन कंगना रनौत (Kangana Ranaut) हिला सध्या सोशल मीडियात चांगलेच ट्रोल केले जात आहे. कारण रनौत हिने तिचा आगामी सिनेमा 'धडक' याच्या रॅप पार्टीतील काही फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. याच कारणामुळे ती ट्रोलर्सच्या निशाणावर आली आहे. कंगना हिने जे फोटो शेअर केले आहेत त्यामध्ये तिने सफेद रंगाचा ट्रान्सपरेंट ब्रालेट आणि सफेद रंगाची पँन्ट घातली आहे. अशातच युजर्सला असे आठवले की, जेव्हा कंगना हिने हॉलिवूड मधील पॉप स्टार रिहाना आणि बॉलिवूड मधील कलाकारांच्या कपड्यांवरुन कमेंट करत त्यांना खडेबोल सुनावले होते.

यावरुन आता एका युजर्सने म्हटले आहे की, ती तुच आहेस ना जिने बॉलिवूड मधील कलाकार आणि रिहाना यांच्या कपड्यांवरुन प्रश्न उपस्थितीत केले होते? आता काय झाले? दुसऱ्या युजर्सने म्हटले की, ती हिच अभिनेत्री आहे ना जी फाटलेली जिन्स आणि भारतीय संस्कृतिबद्दल अक्कल शिकवत होती. अन्य एका युजर्सने थेट प्रश्न विचारला की, हे काय घातले आहे?(#BoycottRadhikaApte ट्वीटर वर होतोय ट्रेंड; Parched मधील न्यूड सीन वरून होत असलेल्या टीकेला तिच्या चाहत्यांकडून Khajuraho Pics शेअर करत पाठिंबा)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिल्यांच्या फाटलेल्या जीन्सवरुन विधान केले होते.त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र कंगना हिने ट्विट करत असे म्हटले होते की, तरुण महिलांना त्यांच्या वर्गानुसारच जीन्स घालावी.

कंगनाने फाटलेली जीन्स घातलेला तिचा फोटो शेअर करत ट्विट केले होते की, जर तुम्ही फाटलेली जीन्स घातली असेल तर लक्षात ठेवा की तुम्ही माझ्यासारखे कूल दिसाल. त्यामुळे पाहणाऱ्याला तुम्हा स्टाइलिश आहात असे वाटेल. सध्या बहुतांश तरुण मंडळी अशाच पद्धतीचे कपडे घालतात.

कंगना हिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने बुडापेस्ट मध्ये आपला आगामी सिनेमा 'धडक' याचे शुटिंग पूर्ण केले आहे. या व्यतिरिक्त ती जयललिता यांचा बायोपिक 'थलाइवी' आणि इंदिरा गांधी यांचा बायोपिक 'इमरजेंसी' मध्ये सुद्धा दिसून येणार आहे.