#BoycottRadhikaApte ट्वीटर वर होतोय ट्रेंड; Parched मधील न्यूड सीन वरून होत असलेल्या टीकेला तिच्या चाहत्यांकडून Khajuraho Pics शेअर करत पाठिंबा
Boycott Radhika Apte (Photo Credits: Twitter)

अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हे नाव पुन्हा ट्वीटर वर चर्चेमध्ये आलं आहे. दरम्यान आज तिच्या नावाची चर्चा कोणत्या सिनेमा, नाटक किंवा वेब सीरीज साठी नव्हे तर एका फोटोमुळे होत आहे. आज (13 ऑगस्ट) ट्वीटर वर #BoycottRadhikaApte हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. Parched या सिनेमामधील राधिकाचा एक इंटिमेट सीन मधील न्यूड फोटो वायरल होत आहे. काहींच्या मते राधिका यामुळे भारतीय संस्कृतीला काळीमा फासत आहे. पण जसे ट्रोलर्स राधिकाच्या मागे आहेत तसेच तिच्या चाहत्यांकडूनही ट्वीटरवर प्रतिसाद मिळत आहे.

एकीकडे राधिकावर इंटिमेट सीन वरून टीका होत असताना तिच्या चाहत्यांकडून खजुराहो (हिंदू आणि जैन मंदिर) मधील फोटो शेअर करत अभिनेत्रीला पाठिंबा दर्शवत आहे. दरम्यान राधिका अशी न्यूड फोटो किंवा इंटिमेट सीन मुळे पहिल्यांदा चर्चेमध्ये आलेली अभिनेत्री नाही. राधिकाने नेहमीच पूर्वपार चालत आलेल्या अभिनेत्रींच्या वाट्याला आलेल्या भूमिका, पात्रांपेक्षा वेगळं काम करण्याला प्राधान्य दिले आहे.

पहा रधिकाच्या समर्थनार्थ ट्वीटर वर दिलेल्या प्रतिक्रिया

Parched हा सिनेमा बालविवाह, बलात्कार, हुंडा या विषया भोवती फिरणारा होता. नेटफ्लिक्स वर रात अकेली मध्ये राधिका शेवटची नवाज़उद्दीन सिद्दीक़ी सोबत दिसली होती. वेब सीरीज शिवाय ती मांझी- द माउंटेनमॅन, पॅडमॅन आणि अंधाधुन मध्ये झळकली होती.