Lock Upp Trailer: कंगना रनौतने सांगितले तिच्या वादग्रस्त शो 'लॉकअप'चे नियम, पहा सेटची झलक
Kangana Ranaut (PC - Instagram)

Lock Upp Trailer: कंगना रनौत (Kangana Ranaut) चा शो 'लॉकअप' (Lock Upp) चा ट्रेलर व्हिडिओ रिलीज झाला आहे. यावेळी कंगना रनौत तिच्या शोबद्दल जरा जास्तच मोकळेपणाने सांगताना दिसत आहे. एकता कपूर निर्मित या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. कंगना राणौतचा हा शो सुपरस्टार सलमान खान होस्ट केलेल्या 'बिग बॉस' शो सारखाच असेल. पण त्यात काय नवीन गोष्टी घडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. नवीन ट्रेलरमध्ये कंगनाने याबाबत एक इशारा दिला आहे.

कंगनाने सांगितले शोचे नियम -

कंगनाने ट्रेलरमध्ये सांगितले आहे की, 'लॉकअप'मध्ये सेलिब्रिटींना कंगनाने बनवलेले नियम पाळावे लागतील. या शोमध्ये अशा वादग्रस्त सेलिब्रिटींचा समावेश केला जाईल जे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहेत. कंगनाने होस्ट केलेल्या या शोमध्ये त्या स्पर्धकांना हातकडी घालून एकत्र बांधले जाईल. (वाचा - Amitabh Bachchan Security: अमिताभ बच्चन यांच्या माजी सुरक्षा रक्षकाला मुंबई पोलिसांनी केलं निलंबित, जाणून घ्या कारण)

कंगनाचा 'लॉकअप' शो कधी सुरू होणार?

ट्रेलर व्हिडिओमध्ये कंगना रणौत सोनेरी रंगाच्या पोशाखात दिसत आहे आणि तिच्या हातात काठी आहे. व्हिडिओ शेअर करत कंगनाने लिहिलं आहे, 'माझे जेल, माझे नियम. तुम्ही 'लॉकअप' पाहण्यासाठी उत्सुक आहात का? ALT 27 फेब्रुवारीपासून बालाजी आणि एमएक्स प्लेयरवर प्रसारित होणार आहे. तुम्ही ते विनामूल्य पाहू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

दरम्यान, कंगनाने याआधीही या शोचा प्रोमो व्हिडिओ शेअर केला होता. जो खूप वादात सापडला होता. कंगनाने प्रोमोमध्ये सांगितले होते की, इथे पप्पांच्या पैशाने जामीन मिळणार नाही. सोशल मीडियावर लोक हा डायलॉग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेशी जोडून पाहत होते. यावर अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या.