Amitabh Bachchan Security: चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे ऑगस्ट 2021 पर्यंत अंगरक्षक म्हणून काम करणाऱ्या मुंबई पोलीस हवालदाराला सेवा नियमांचे उल्लंघन (Violation of Service Norms) केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) यांच्या निलंबनाचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
शिंदे यापूर्वी मुंबई पोलिसांच्या सुरक्षा विभागात कार्यरत होते. जितेंद्र शिंदे यांनी 2015 ते ऑगस्ट 2021 पर्यंत अमिताभ बच्चन यांचे अंगरक्षक म्हणून काम केले. शिंदे यांचे वार्षिक उत्पन्न दीड कोटींवर गेल्याचे समोर आल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी शिंदे यांना तेथून हटवले. ऑगस्ट 2021 नंतर जितेंद्र शिंदे यांची मुंबईतील डीबी मार पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली. ( वाचा -
शिंदे यांच्या निलंबनाचे नेमके कारण विचारले असता, मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हवालदाराने आपल्या वरिष्ठांना न कळवता किमान चार वेळा दुबई आणि सिंगापूरला प्रवास केला होता. सेवेच्या नियमानुसार शिंदे यांनी परदेशात जाण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घ्यायला हवी होती. पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, शिंदे यांनी बच्चन कुटुंबाला सुरक्षा पुरवणाऱ्या पत्नीच्या नावावर एक सुरक्षा एजन्सीही उघडली होती. परंतु शुल्काचा व्यवहार शिंदे यांच्या बँक खात्यात दिसून आला.
शिंदे यांनी काही मालमत्ताही खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शिंदे यांच्या निलंबनानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण) दिलीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे.