बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कंगनाने ट्विटरवर स्वत:च्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोशी निगडीत बालपणीचा एक प्रसंग तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. लहान असताना लोक तिला जोकर म्हणून का चिडवायचे? याबाबतही तिने खुलासा केला आहे. सध्या फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून कंगनाच्या या ट्विटला संपूर्ण देशातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना सोशल मीडियावर अधिकच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून बॉलिवूड आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीकादेखील केल्या आहेत. यामुळे कंगणा यावेळी काय ट्विट करते? याकडे अनेकांचे लक्ष आहे. मात्र, कंगनाने नुकताच केलेल्या ट्विटमध्ये तिने स्वत: बद्दलच लिहले आहे. या ट्विटमध्ये कंगणा म्हणते, "मी लहान असताना मला मोत्यांचे दागिने घालण्याची खूप आवड होती. एवढेच नव्हेतर, मी माझे केस स्वत:च कापत असे. यामुळे अनेकजण माझ्यावर हासायचे आणि मला जोकर म्हणूनदेखील चिडवायचे. मी एका लहानशा गावातून पॅरिस न्यूयॉर्क फॅशन विकपर्यंत प्रवास केला आहे. फॅशन हे स्वत:ला सिद्ध करण्याचे एक साधन आहे." अशी ती म्हणाली आहे. हे देखील वाचा-शाहरुख खान ची मुलगी Suhana Khan हिने रंगावरुन थट्टा करण्याऱ्यांना सोशल मीडियात पोस्ट करत दिले 'हे' सडेतोड उत्तर
कंगणा रनौतचे ट्विट-
When I was a little girl I decorated myself with pearls, cut my own hair, wore thigh high socks and heels. People laughed at me. From being a village clown to attending front rows of London, Paris, New York Fashion weeks I realised fashion is nothing but freedom of expression ❤️ pic.twitter.com/EHW6wUZnNi
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 30, 2020
कंगना रणौतने गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारवर टीका करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात एक ट्विट केले होते. ज्यातून तिने राज्य सरकारचा उल्लेख फॅसिस्ट सरकार असा केला होता. या ट्विटनंतर तिच्यावर अनेकांनी टीका केली आहे.