मुंबई महापौरांच्या 'त्या' विधानावर कंगना रनौत हिचे प्रत्युत्तर; आदित्य पंचोली आणि ऋतिक रोशन च्या नावाचाही उल्लेख
कंगना रनौत (Photo Credits: Yogen Shah)

बीएमसीकडून करण्यात आलेल्या तोडक कारवाई प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranaut) हिच्या पक्षात मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) निर्णय दिला. त्यानंतर मुंबई महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रीया देताना 'दो टके के लोग' असा उल्लेख केला. तसंच हिमाचल प्रदेशहून आलेली अभिनेत्री मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणते. हे लोक न्यायालयाला राजकीय आखाडा बनवू पाहत आहेत. हे चुकीचे असल्याचेही त्या म्हणाल्या. यावर आता कंगना रनौत हिने प्रत्युत्तर दिले आहे. तसंच आदित्य पंचोली (Aaditya Pancholi) आणि  ऋतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे.

कंगना रनौत हिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्र सरकारकडून ऐकलेल्या सर्व कायदेशीर बाबी, शिवीगाळ, अपमान, शिवगाळ यामुळे मी बॉलिवूड माफिया बनले आहे. तर आदित्य पंचोली आणि हृतिक रोशनसारखे लोक दयाळू वाटू लागले आहेत. मला आश्चर्य वाटते की, माझ्यात असे काय आहे, जे लोकांना खूप त्रास देते." (मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर कंगना रनौत आनंद व्यक्त करत म्हणाली 'लोकतंत्रचा विजय झाला', Watch Video)

पहा ट्विट्स:

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालावर कंगनाने आनंद व्यक्त करत हा लोकशाहीचा विजय असल्याचे म्हटले होते. बीसीएमसीने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा निर्णय हायकोर्टाने दिला असला तरी सरकार आणि इतर व्यक्तींविषयी सोशल मीडियावर भाष्य करताना संयम दाखवावा, अशी समजही कंगना रनौत हिला दिली आहे.