Thug Life Teaser:  'ठग लाईफ' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, कमल हासन आणि मणिरत्नम ३६ वर्षांनी एकत्र
Kamal Hasan New Movie

Thug Life Teaser: चाची 420 हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येतं ते कमल हासन यांचा दादीचा पेहराव. आज  सुपरस्टार कलम हासन यांचा 69वा वाढदिवस आहे. कलम हासन यांच्या चाहता वर्ग अजूनही आहे. त्यांनी आज आपल्या चाहत्यांसाठी खास भेट दिली आहे. त्यांनी बऱ्याच वर्षानंंतर पुन्हा एकदा चित्रपसृष्टीत पदार्पण केलं. नायकन या सिनेमानंतर तब्ल 36 वर्षांनी 'ठग लाईफ' या सिनेमाच्या माध्यमातून कमल हासन आणि मणिरत्नम एकत्र काम करणार आहे.  प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागली आहे.

कमल हासन यांचा आगमी चित्रपट 'ठग लाईफ' या सिनेमाच्या टीझर आऊट झाला आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कमल हासन आणि मणिरत्नम हे दोघेही या चित्रपटात 36 वर्षांनी एकत्र झळकणार आहे. त्यामुळे कमल हासन यांच्या चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याची आतुरता लागली आहे. कमल हासन सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असतात. आगामी चित्रपट 'ठग लाईफ'चा पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रेक्षकांनी पोस्टर पाहून कंमेटचा वर्षाव केला आहे.

'ठग लाईफ'चा टीझर

अभिनय, दिग्दर्शन, लेखन, निर्माते, पार्श्वगायन, गीतकार, नृत्य दिग्दर्शन व नर्तक अश्या अनेक कलागुणांनी संपन्न असलेले कमल हासन यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. कमल हासन हे एक असं व्यक्तिमत्त्व आहे ज्यांनी ७ ऑस्कर अवॉर्ड जिंकले आहे. आगामी दोन चित्रपटासाठी कमल हासन व्यस्त आहे.