Anant-Radhika Wedding: जस्टिन बीबर मुंबईत पोहोचला; अनंत-राधिकाच्या संगीत फंक्शनमध्ये करणार खास परफॉर्म, जाणून घ्या 'किती' घेतली फी
Anant-Radhika, Justin Bieber (PC - Instagram)

Anant-Radhika Wedding: आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बीबर (Justin Bieber) गुरुवारी सकाळी भारतात पोहोचला. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री-वेडिंग फंक्शन (Pre-Wedding Function)मध्ये 5 जुलै रोजी जस्टिन बीबर परफॉर्म करणार आहे. गुरुवारी सकाळी जस्टिन मुंबई विमानतळावर उतरला. गायकांच्या वाहनांच्या ताफ्याचे व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. बीबर 7 वर्षांनंतर भारतात परतला आहे, परंतु यावेळी तो फक्त अंबानी कुटुंब आणि त्यांच्या पाहुण्यांसाठी परफॉर्म करणार आहे. गायकाने 2022 मध्ये भारतात मैफिलीची घोषणा केली होती, परंतु नंतर त्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती रद्द करण्यात आली.

जस्टिन बीबरने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी 50 कोटींहून अधिक फी घेतली आहे. जस्टिन बीबर हा परदेशातील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहे आणि त्याच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी चाहते लाखो आणि करोडो रुपये खर्च करतात. त्यामुळे जस्टिनचा खासगी शो किती महाग असेल? याची कल्पना ना केलेलीचं बरी. पण अंबानी यांनी त्याचा खाजगी शो ठेवला आहे. रिपोर्ट्सनुसार जस्टिनची फी 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. पण अंबानींच्या बाबतीत ती जास्त असण्याची शक्यता आहे. यामध्ये गायकाचा जेवण, प्रवास, निवास आणि इतर खर्च देखील आहे. (हेही वाचा -Anant-Radhika Wedding Card: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका आली समोर, मोठ्या बॉक्समध्ये चांदीच्या मंदिरासह देव-देवतांची छायाचित्रे)

अनंत आणि राधिका यांचा संगीत सोहळा शुक्रवार, 5 जुलै रोजी त्यांच्या मुंबईतील आलिशान घर अँटिलिया येथे होणार आहे. हे जोडपे 12 जुलै रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अंबानी कुटुंब त्यांच्या लग्न समारंभात सादर करण्यासाठी ॲडेल, ड्रेक आणि लाना डेल रे यांच्याशी चर्चा करत आहे. तथापि, अद्याप याबाबतीत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. (हेही वाचा - Anant Ambani-Radhika Merchant Wedding: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनंत-राधिका च्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी Mukesh Ambani पोहचले भेटीला! (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अनंत आणि राधिकाने या वर्षाच्या सुरुवातीला जामनगरमध्ये एक भव्य प्री-वेडिंग पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये रिहाना, दिलजीत दोसांझ, अरिजित सिंग, श्रेया घोषाल आणि इतरांसह अनेक मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. यानंतर फ्रेंच क्रूझवर त्यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग पार्टीदरम्यान, कॅटी पेरी, पिटबुल, द बॅकस्ट्रीट बॉईज आणि इटालियन ऑपेरा कलाकार अँड्रिया बोसेली यांनी हजेरी लावली होती. अलीकडेच अंबानी कुटुंबाने सामूहिक विवाहही आयोजित केला होता, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.