अभिनेत्री पूजा सावंत (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Junglee Movie: मराठमोठी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) हिने आपल्या 'क्षणभर विश्रांती' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतरही मराठी चित्रपटातून विविध अभिनय सादर करत पूजा हिने आपल्या अभिनयाची प्रेक्षकांवर छाप पाडली आहे.

मात्र आता पूजा ही बॉलिवूड मध्ये पदार्पण करत असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. तर 'जंगली' (Junglee) या बॉलिवूड चित्रपटातून अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) सोबत झळकणार आहे. या चित्रपटाची कथा ही वन्यजीव प्रेमी व्यक्तीवर आधारित आहे. तर हत्तींची शिकार फार होत असल्याने त्या विरुद्ध आवाज उठवून संघर्ष करणाऱ्या व्यक्तीची भूमिका विद्युत साकारणार आहे. त्याचसोबत पूजा ही एका महत्वाच्या भूमिकेतून झळकणार आहे.

जंगली पिक्चर्स यांची निर्मिती असून चर सरेल दिग्दर्शित हा चित्रपट आहे.येत्या 5 एप्रिल, 2019 रोजी जंगली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.