Jhund First Look: नागराज मंजुळे दिग्दर्शित आगामी बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी शेअर केलं खास पोस्टर
Jhund’ first look | Photo Credits: Twitter

Jhund First Poster: सैराट फेम लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) याचा आगामी 'झुंड' या सिनेमाचं पहिलं वहिलं पोस्टर आज (20 जानेवारी) रसिकांच्या भेटीला आलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'झुंड' या नागराजच्या बॉलिवूड डेब्यू सिनेमामध्ये बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) प्रमुख भूमिका साकारणार आहेत. आज अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यामातून 'झुंड' सिनेमाचं पहिलं पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. प्रदर्शनाआधी नागराज मंजुळेंचा 'झुंड' वादाच्या भोवऱ्यात; कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत दिग्दर्शकासह अमिताभ बच्चन यांनाही नोटीस.

‘झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन फूटबॉल प्रशिक्षण विजय बरसे यांची भूमिका साकारत आहेत. विजय बरसे हे झोपडपट्टीतील तरुणांना फूटबॉलचे प्रशिक्षण देतात. त्यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. झोपडपट्टीमध्ये राहणारा अखिलेश कसा मोठा फुटबॉलपटू बनतो ही कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. दरम्यान हा सिनेमा रिलीज कधी होणार याची उत्सुकता रसिकांच्या मनात आहे. मात्र उद्या झुंड सिनेमाची रिलीज डेटदेखील सांगितली जाईल असे बिग बी यांनी ट्विट करून सांगितले आहे. (हेही वाचा: Big B यांचा खूप दिवसानंतर गावातील बैलगाडीतून प्रवास, दिला जुन्या आठवणींना उजाळा)

झुंड सिनेमाचं पहिलं पोस्टर

Jhund First Look नागराज मंजुळे दिग्दर्शित बॉलिवूड सिनेमाची पहिली झलक; अमिताभ बच्चन यांनी केलं शेअर Watch Video

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडीयावर 'झुंड' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो शेअर केले होते. यामध्ये बैलगाडी, एसटी महामंडळाच्या बसमधून केलेल्या प्रवासाचे फोटो शेअर केले होते. झुंड सिनेमाचं शुटिंग नागपूरमध्ये झाले आहे.