लॉकडाऊन आणि कोरोना काळात अनेकांच्या नोक-या गेल्या. हातावर पोट असलेले लोक बेघर होऊन रस्त्यावर आले. अशा परिस्थितीत खायचे काय असा प्रश्न अनेक गोरगरिबांना पडला आहे. अशा लोकांसाठी दिग्गज मंडळी आपापल्या परीने हवी ती मदत आहे. याच धर्तीवर बॉलिवूड अभिनेत्री जैकलीन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतीच एका फाउंडेशनची सुरुवात केली. अभिनेत्रीद्वारे स्थापन करण्यात आलेल्या 'यू ओनली लिव वन्स' (वायओएलओ) फाउंडेशन अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून काम करणार आहे. जैकलीनने सोशल मिडियावर याबाबत माहिती दिली आहे.
अभिनेत्रीने ‘रोटी बँक फाउंडेशन’सोबत मिळून एकत्रपणे काम करता यावे या उद्देशाने नुकतीच ‘रोटी बँक फाउंडेशन’च्या स्वयंपाकघराला भेट दिली. रोटी बँक टीम आणि आपली YOLO टीमसोबत जॅकलीनने त्या ठिकाणी जेवण बनवण्याच्या प्रक्रियेत सहयोग दिला आणि त्या माध्यमातून गरजूंना अन्न वाटप देखील केले.हेदेखील वाचा- Anushka Sharma ने व्हिडिओ शेअर करुन सांगितले वाढदिवस साजरा न करण्याचे कारण, सोबतच केली महत्त्वाची घोषणा
View this post on Instagram
या अनुभवाविषयी अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर लिहिले की, फोटो शेअर करत तिने मदर तेरेसा यांचा एक विचारही मांडला आहे. 'शांततेची सुरुवात ही भुकेलेल्याची भूक भागवून होते.'
रोटी बँक ही संस्था माझी मुंबई पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी सुरू केली होती.
रोटी बँक आणि योलो फाउंडेशन यांच्यावतीने हे अन्नदान करण्यात येते.
आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सुरु ठेवत, जॅकलीन मुंबई पुलिस दलासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करणार असून या कठीण काळात भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी पुढाकार घेणार आहे.
दरम्यान राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्ना पुढे आले असून ऑक्सिजनची कमतरता भागविण्यासाठी ट्विंकल खन्ना यांनी 250 यूनिट ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आणि 5000 नेझल कॅन्युलामध्ये योगदान देण्याचे ठरविले आहे. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांनी ही देणगी दिली आहे.