Anushka Sharma ने व्हिडिओ शेअर करुन सांगितले वाढदिवस साजरा न करण्याचे कारण, सोबतच केली महत्त्वाची घोषणा
Anushka Sharma (Photo Credits: Instagram/Twitter)

संपूर्ण भारत देश कोरोनाविरुद्ध एक मोठी लढाई लढत असताना या लढाईत दिग्गज मंडळी आपल्या परीने मदत करत आहे. यात अनेक सेलिब्रिटी, उच्चभ्रू व्यक्ती, खेळाडू, गायकांचा समावेश आहेत. त्यात आता अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि पती विराट कोहली (Virat Kohli) हे देखील या लढ्यात सहभागी होऊन आपल्या देशासाठी मोलाचे योगदान देणार आहेत. अनुष्का शर्माने (Anushka Sharma) इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. तसेच या व्हिडिओमध्ये अनुष्काने आपण यंदा आपला वाढदिवस का साजरा केला नाही याचे कारण देखील सांगितले आहे.

"आपला संपूर्ण देश कठीण काळातून जात असल्या कारणाने मी यंदा माझा वाढदिवस साजरा केला नाही. मात्र तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल तुमचे आभार" असे अनुष्का या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे.हेदेखील वाचा- कोरोना संकटात मदत करण्यासाठी पुढे आली अक्षय कुमारची पत्नी Twinkle Khanna; 250 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचे दिले योगदान

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

"आपल्या देशाला व देशवासियांवर आलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मी आणि विराट एकत्र येऊन महत्त्वाचे योगदान देणार आहोत. लवकरच तुम्हाला याबाबत माहिती दिली जाईल. जेणकरून तुम्हीही याचा हिस्सा बनू शकाल आणि देशाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू शकाल." असेही ती पुढे म्हणाली. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा असा संदेश देखील अनुष्काने सर्वांना व्हिडिओद्वारे दिला आहे.

दरम्यान देशाच्या या बिकट परिस्थितीवर देसी गर्ल आणि ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिने गरजूंच्या मदतीसाठी निधी जमा करण्यास सुरुवात केली आहे. प्रियंका चोप्राने भारतातील सध्याच्या कोरोना स्थितीवरील व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत प्रियंकाने लिहिले की, "कोविड-19 चे दुष्परिणाम रोखण्यासाठी भारताची लढाई सुरु आहे. गिव्ह इंडिया ला दिलेले तुमचे योगदान मोठा बदल घडवून आणू शकतात. तुमचे योगदान अनेक आयुष्य वाचवू शकतं. भारतासाठी एकत्र या."