मालिका, चित्रपटांच्या चित्रीकरणसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या 'या' निर्णयावर जेष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ नाराज
Jackie Shroff (Photo Credit: Facebook)

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील अनेक उद्यागधंदे, व्यवसाय, वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. मनोरंजन उद्योगावरही मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, अनेक चित्रपट लांबणीवर गेले आहेत. ज्यामुळे अनेक कलाकारांना बेरोजगारीचा सामाना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणास परवानगी दिली आहे. तसेच मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरण संदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहे. त्यात 65 वर्षावरील कलाकारांना शुटींगसाठी मनाई करण्यात आली आहे. या निर्णयावर जेष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सरकारचा हा निर्णय चूकीचा असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोनाचे संकट वावरत असून जेष्ठ नागरिकांना यापासून अधिक धोका असल्यामुळे राज्य सरकारने सिनेसृष्टीतील 65 वर्षावरील कलाकारांना शुटींगसाठी मनाई केली आहे. महत्वाचे म्हणजे, मालिका किंवा चित्रपटांमध्ये जेष्ठ कलाकार आई, वडील, आजोबांच्या भूमिका साकरतात. मात्र, राज्य सरकार घेतलेल्या निर्णयावर जॅकी श्रॉफ यांनी “सरकारचा हा निर्णय निराधार आहे.” अशा आशयाचे ट्विट करुन नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्य सरकारच्या निर्णयामुळे सिनेसृष्टीतील अनेक जेष्ठ कलाकारांना बरोजगारीचा सामना करावा लागणार आहे, असेही मत अनेकांनी मांडली आहेत. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी यशराज चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा यांची 4 तास चौकशी

जॅकी श्रॉफ यांचे ट्वीट-

नवीन दिशानिर्देशांनुसार केवळ 33% कर्मचारी कामावर बोलावून चित्रीकरण सुरु करता येईल. डॉक्टर्स, परिचारिका, ताप मोजणी यंत्र, रुग्णवाहिका इत्यादी बाळगणे अनिवार्य आहे. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अभिनेत्यांना सेटवर जाता येणार नाही. अनेक निर्बंध शिथिल करण्याची मागणी करणारे पत्र निर्माता संघटनेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीले आहे.