आर. के. स्टुडिओजमधील काही जागा राज कपूर यांच्या म्यूझियमसाठी राखीव ठेवावी, IFTDA यांची गोदरेज प्रॉपर्टीज यांना अपील
R.K. Studios (Photo Credits-Wikimedia Commons)

आर.के. स्टुडिओजचे (R.K. Studios) कपुर कुटुंबियांनी आता त्याचे मालकी हक्क गोदरेज प्रॉपर्टीज यांच्याकडे दिले आहेत. या स्टुडिओजच्या जागेवर गोदरेजकडून आलिशान फ्लॅट्स बनवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु इंडियन फिल्म अँन्ड टेलिव्हिजन डायरेक्टर एसोसिएशन (IFTDA) यांनी पत्राद्वारे गोदरेजकडे राज कपूर (Raj Kapoor) यांच्या म्युझियमच्या उभारणीसाठी काही जागा शिल्लक ठेवावी असे अपील केले आहे.

पत्रात असे लिहिले आहे की, राज कपूर हे स्वत: संस्था आहेत. तसेच नव्या दिग्दर्शकांसाठी ते एक प्रेरणास्थान आहेत. त्याचसोबत मीडियाचे विद्यार्थी आणि अभिनायात राष्ट्रासाठी उत्तम उदाहरण आहेत. येत्या पिढीसाठी या संस्थेचा बचाव करणे अत्यावश्यक आहे. तर टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत रणधीर कपूर यांनी असे म्हटले होते की, आर. के. स्टुडिओचा कपूर कुटुंबियांनी सन्मान केला त्याचप्रमाणे आता सुद्धा केला पाहिजे.(मुंबई: आर.के. स्टुडिओचे मालकी हक्क आता गोदरेज प्रॉपर्टीजला दिले, कपूर कुटुंबियांचा निर्णय)

2017 रोजी आर. के. स्टुडिओजला भीषण आग लागली होती. त्यामुळे स्टुडिओजचे खुप मोठे नुकसान झाले होते. रणधीर कपूर यांचे असे म्हणणे होते की, आग लागल्यानंतर त्याची देखभाल करणे कठीण होते त्यामुळे त्यांनी स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे.