रेल्वे प्लॅटफॉर्म ते प्लेबॅक सिंगर असा प्रवास करणाऱ्या रानू मंडलला न ओळखणारं क्वचितच कोणी असेल. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वेस्टेशनवर गाणं गाऊन पोटभरणाऱ्या रानू मंडल या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे अगदी रातोरात स्टार बनल्या होत्या. त्या व्हिडिओमध्ये लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं रानू मंडल गात होत्या आणि त्याचा व्हिडिओमधील आवाज नेटकऱ्यांना इतका भावला की चक्क बॉलिवूड प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमिया याने त्यांना त्याच्या एका सिनेमात गाण्याची संधी दिली.
परंतु हाच हिमेश एका इव्हेंट दरम्यान रेणू मंडळ यांचं नाव ऐकताच भडकला होता. पण यामागचं नेमकं कारण काय होतं ते जाणून घेऊया.
मुंबईत अलीकडेच एका इव्हेंटमध्ये हिमेश रेशमिया आपल्या परफॉर्मन्ससाठी पोहोचला होता. परंतु, तिथल्या उपस्थित पत्रकारांनी त्याला रानू मंडलशी संबंधीत एक प्रश्न केला. त्यावर हिमेश भडकला आणि म्हणाला, "मी त्यांचा मॅनेजर नाही, जे तुम्ही मला त्यांच्याबद्दल विचारत आहात. इंडस्ट्रीमध्ये ब्रेक मी फक्त रानू मंडललाच नाही तर आर्यन, दर्शन, शैनन, पलक मुच्छल यासारख्या अनेक गायकांना संधी दिली आहे.
रानू मंडल हिचे गोल्डन रंगाच्या मेकअप मधील फोटो सोशल मीडियात व्हायरल, नेटकऱ्यांकडून खिल्ली
दरम्यान, रानू मंडल यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येतंय. त्याबद्दल बोलताना हिमेश म्हणाला की, "रानू यांच्या सेल्फीवाल्या व्हिडीओवरुन झालेल्या ट्रोलिंगबद्दल मी ऐकलं आहे. मात्र त्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. खरंतर, हे सर्व तुम्ही मला विचारण्यापेक्षा रानू मंडल यांनाच जाऊन विचारायला हवं."